अकोला (प्रतिनिधी) : अ.भा. कुनबी समाज बहू मंडळ अकोल्याच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, राज्याचे क्यबिनेटमंत्री ना. डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत समाजातील गुणवंत विध्यार्थी व विविध शेत्रात मोलाचे कार्य करनार्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. संजय कुटे यांची वृक्षतूला करुन उपस्थित नागरिकमधे वृक्षाचे वाटप करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजय धोत्रे यांची धेट केंद्रीय राज्यमंत्री पदावर वर्णी लागली. त्या पाठोपाठ राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करित भाजपचे सरचिटनिस डॉक्टर संजय कुटे यांची क्याबिनेट मंत्रीपदी नियुक्ती केली.यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
अ.भा. कुनबी समाज मंडळ अकोल्याच्या वतीने अध्यक्ष महादेवराव कौसाल यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही लोकनेत्यांचा तसेच समाजातील 200 गुणवंत विद्यार्थी आनी विविध श्रेत्रातील पुरस्कार प्राप्त नागरिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी ना. संजय धोत्रे, ना. संजय कुटे यांचा शाल नारळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ना. संजय कुटे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी राजकारण बाजुला सारत एकदीलाने कामकरन्याचे आवाहन केले.
समजाने एका व्यासपिठाखाली येवुन कार्य केल्यास सकारात्मक परिणाम दिसतील असा सल्ला त्यांनी यावेळी दिला, याप्रसंगी क्यन्सरग्रस्त सर्पमित्र बाळ काळणे यांना समाजाच्या वतीने रोख मदत देवुन मायाताई डीवरे यांनी बाळ काळने यांच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करणार असल्याचे जाहिर केले.यावेळी मुम्बई येथिल डॉक्टर प्रा.शरदराव कोकाटे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून जी.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार न्यानदेव ठाकरे, रावसाहेब वाकडे, विजय कौसाल, नारायण गावंडे, मनोहर हरने, वासुदेव टीकार, संजय तीवळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रवी हेलगे, पदमा कोल्हे यांनी केले. आभार विजय भोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष अनिल गावंडे, राजू आढे, सचिव समाधान महल्ले, देवीदास पोटे, रघूनाथ कोल्हे,प्रल्हाद थोटे, प्रा.आनंद काळे, रामराव पाटेखेडे, हनुमंत आगरकर, जयंत फाटे, विनोद राऊत, सचिन कोकाटे, श्रीकृष्ण फाटकर यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : नवजीवन एक्सप्रेस मधून पडून अकोल्यातील दोघांचा वर्धा जिल्ह्यात अपघाती मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola