बोर्डी (देवानंद खिरकर) : गेल्या दोन दीवसापासून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी प आंतरराष्ट्रीय शाळा बोर्डी येथे शालेय मंत्रिमंडळ करिता जोरदार प्रचार सुरु होता. परवा दुपारी 3 वाजता पासुन प्रत्यक्ष मतदानाला सुरवात झाली. वर्ग 6 ते 8 च्या 112 मतदारांनी मतदान केले.एकुण मतदान 93 टक्के झाले. यावेळी शाळे मधे अगदी खर्या खूर्या मतदान केंद्राचा सेटअप करण्यात आला होता. मतदान अधिकारी 1, 2, 3, ची भुमिका इयत्ता 8 वीच्या मुलींनी चोखपणे पार पाडली. पोलिस शिपाई, निवडणूक निरिक्षण अधिकारी यांनी प्रकियेवर बारीक लक्ष ठेवले. एका मतदाराचे नाव मतदार यादीत (हजेरी पुस्तिकेत )नसल्याने त्याला मतदान कर्ता न आल्याने त्याचा हिरमोड झाला. सायंकाळि 5 वाजता मतदान संपले. आनी मग सर्वना उत्सुकता होती ती मतमोजणीची.
शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली तेव्हा उमेदवाराचे प्रतिनिधि मतमोजणीला हजर होते. एकुण झालेल्या मतदानात 1 मत अवैध ठरल 111 मतांचीच मतमोजणी करण्यात आली. त्यामधे 7 अ वर्गाचे उमेदवार चि. अपुर्व याला 34 मते मिळालि तर 8 वीच्या वर्गातून कू. मीनाक्षी 33 मते घेऊन दुसर्या क्रमांकावर राहीली तर काही उमेदवार आपले डीपाझिटही वाचवु शकले नाही.शाळेच्या जेष्ठ शिक्षिका कू. निर्मला अम्बिलकर मैडम व जेष्ठ शिक्षक श्री. प्रभाकर नागरे सर यांनी नवनियुक्त प्रातिनिधिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपण दिलेली वचने पाळू असे आस्वासन पंतप्रधान उपपंतप्रधान यांनी मनोगतातून दिले. यावेळीहा उपक्रम राबविण्यासाठी श्री.प्र भाकर नागरे, श्री. उमेश चोरे, श्री. अजय अस्वार, श्री. प्रवीण चिकटे, कू. निर्मला आबीलकर, कू. साबळे, कू. बूदीले, कू. शर्मा, कू. मावदे, यांनी मोलाचे सहकार्य केले.
अधिक वाचा : उत्पादन खर्च वजा जाता कुटुंब पोसेल एवढे उत्पन्न काढून दाखवावे झीरो बजेट नैसर्गीक शेती तंत्राला डॉ निलेश पाटील यांचे आव्हान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola