अकोला (प्रतिनिधी) : झीरो बजेट किंवा सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती तंत्रातून उत्पादन खर्च वजा जाता 5 लोकांचे कुटुंब पोसले जाऊ शकेल एवढे उत्पन्न काढून दाखवावे असे आव्हान युवाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी संघटना युवा आघाडी चे विदर्भ प्रमुख डॉ. निलेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केले आहे.
श्रम, बुद्धी, गुंतवणूक व भांडवल पणाला लावून देशाचे पोट भरण्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची “झीरो बजेट” म्हणून अवहेलना करू नये किंवा झीरो बजेट शेती कशी होते हे प्रात्याक्षिका द्वारे सिद्ध करून दाखवावे या साठी हे आव्हान असल्याचे डॉ निलेश पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
शेतीचा उत्पादनखर्च काढण्यासंबंधीचा शेतकऱ्यांचा व्यवस्थेशी जुना वाद असून झीरो बजेट संकल्पना या वादात तेल टाकण्याचे काम करत आहे.शेतकऱ्यांना फक्त पेरणे अन हंगाम एवढाच जमाखर्च नसून शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, मजुरी, फॅमिली लेबर, व्यवस्थापकीय मजुरी, वाहतूक व इतर खर्च, जमिनीच्या भांडवलाचे व्याज व जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी जमिनीचा घसारा ई खर्च शास्त्रीय दृष्ट्या उत्पादनखर्चात समाविष्ट होतात. शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी व आत्महत्या थांबवण्यासाठी अशा पद्धतीने उत्पादनखर्च निघणे हेच न्यायोचीत आहे. उत्पादनखर्च हा नमुना पद्धतीने काढावा, सरासरी पद्धतीने नको कारण सरासरी पद्धत शेतकऱ्यांपरत्वे उत्पादनखर्च बदलता असल्याने न्यायोचीत होत नाही. या साठी व्यवस्थेशी भांडण चालू असतांनाच झीरो बजेट किंवा नैसर्गीक शेतीसारख्या संकल्पना शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यास उभ्या राहतात म्हणून हे आव्हान द्यावे लागत असल्याचे त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.
वास्तविक आज जागतीक स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची गरज आहे.पाळेकर सांगतात त्या प्रकारची शेती आपण पूर्वी करून चुकलो आहो 32 कोटी लोकांचे पोट भरत नव्हते,आज लोकसंख्या 135 कोटींच्या आसपास आहे. युवकांच्या वाढत्या जनसंख्येच्या हातांना काम मिळण्यासाठी शेती व त्यासंबंधी निगडीत क्षेत्रांशीवाय ठोस पर्याय नाही. जागतीक बाजारपेठांच्या आजच्या परिवेशात जागतीक स्पर्धेत उतरल्या शिवाय पर्याय नाही.
सुभाष पाळेकर सांगत असलेल्या स्वयंघोषित बुवाबाजीच्या नैसर्गिक शेतीपद्धतीमध्ये जर समस्येचे उत्तर असेल तर मी माझी 5 एकर बागायती शेती विनामूल्य लीज वर देऊ करतो आहे. 5 एकरच या साठी की देशातील 86% पेक्षा अधीक शेतकरी आज 5 एकराच्या आतील शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी काही दिशादर्शक काम उभे राहावे. या शेतीवर त्यांनी ते सांगितलेल्या मॉडेल्स चे डेमो प्लॉटस पूर्ण नैसर्गिक पद्धतीने उभे करून व उत्पन्न घेऊन दाखवावे व ते दावा करतात त्या प्रमाणे लाखोंचे उत्पन्न देणारे मॉडेल त्यांनी या सुपीक बागायती जमिनीत शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उभे करावे.
मी ही शेती मोफत वीज व पाण्यासह वापरायला देत आहो कारण शून्य खर्चात लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या झीरो बजेट शेती संकल्पनेचे जनक असलेल्या पाळेकरांना आपल्या शेतीपद्धतीचे यश दाखवणारे असे मॉडेल निर्माण करता आले नाही. सरकार दरबारी एवढा मानमरातब व प्रोत्साहन लाभूनही 1 टक्काही शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारले नाही. पाळेकरांच्या गावातही नाही, कुटुंबातही नाही स्वतः पाळेकरांची शेती नैसर्गिक ही नाही, झीरो बजेटही नाही, फायद्याची तर मुळीच नाही.त्यांच्या कडे काही संसाधनांचा अभाव असेल तर त्यांनी माझी शेती, पाणी, वीज वापरावी सर्व मॉडेल्स चे झीरो बजेट, नैसर्गिक, अध्यात्मिक, शेतीचे छोटे छोटे डेमो प्लॉटस तयार करावेत त्यातून ते दावा करत असल्यापैकी किमान 50% तरी निव्वळ उत्पन्न काढून दाखवावे, जेणेकरून ते पाहून या कथीत तंत्राची व्यावहारीक सत्यता समोर येईल.
नैसर्गीक शेतीचा व शेतीच्या एकंदर आर्थीक प्रोटोकॉल चा अंतर्भाव असलेला माझा या संबंधीचा करारनामा मी सार्वजनिक करणार आहे.त्यावर चर्चा, वादविवाद आदी झाल्यानंतर पाळेकर पंथापैकी कुणी समोर आल्यास शासन व प्रशासन यांच्या उपस्थितीत पुढील हंगामापासून माझी शेतजमीन पाळेकर तंत्रासाठी मोफत लिजवर द्यायला तयार आहे. सर्व शेतकरी, गावकरी, कृषिविभाग, कृषिविद्यापीठ, कृषिविज्ञान केंद्र, शास्त्रज्ञ,प्र योगशील शेतकरी, मीडिया प्रतिनिधी आदींचे या डेमो प्लॉटस वर लक्ष असेल असे डॉ निलेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अधिक वाचा : ना. संजय कुटे यांचे तेल्हाऱ्यात जंगी स्वागत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola