अकोला : अकोट- शहराचे अराध्य ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिर, श्री विठ्ठल मंदिर धबडगाव वेटाळ, राम मंदिर मोठे बारगण, विठ्ठल मंदिर मोठी मढी, गजानन महाराज मंदिर अंजनगाव रोड या ठिकाणी फराळ वितरण केले. तसेच शहरातील अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेली हभप श्री बोडखे महाराज यांच्या नेतृत्वातील नगर प्रदक्षिणा करणाऱ्या वारकरी दिंडीचे गजानन मंदिर येथे तालुकाध्यक्ष अनंतराव सपकाळ यांनी शाल व श्रीफळ देऊन बोडखे महाराजांचे तर दिंडीतील विणेकरी यांचे स्वागत गजानन पा रावनकार यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
यानंतर दिंडीतील महिला पुरुष वारकऱ्यांना लोकजागर महिला मंच च्या शहराध्यक्षा सौ वैशालीताई बिबेकर, वंदनाताई रोहणेकर, तालुकाध्यक्षा भावनाताई गावंडे, यांनी फराळ व शितपेय वितरित केले यावेळी चौखंडेताई, सुवर्णा ठाकरे, ममता गावंडे, योगीताताई, हिरुळकर ताई, किरणताई, राधिका गावंडे आदी सदस्या व पदाधिकारी उपस्थीत होते.
तसेच मोठे बारगण पान अटाई चौकात लोकजागर मंच शहर उपाध्यक्ष देवा कायवाटे यांनी हभप श्री बोडखे महाराज यांचे शाल श्रीफळ देऊन तर विणेकरी यांचे योगेश जायले, अर्जुन गाळखे यांनी स्वागत केले. त्यानंतर वारकऱ्यांना शितपेय वाटप करण्यात आले. यावेळी राजेश गावंडे, आकाश बरेठिया, सुरज शेंडोकार, मयूर भगत, पवन जाधव, प्रतीक रोहणेकर, शुभम काहार, हर्षल गावंडे, अक्षय मामनकार, शैलेश इंगोले, विक्की पवार, विखे गुरुजी, शरद पाथरीकर,मं गेश वाघ, देवा रंधे, योगेश हापसे, अक्षय कोमट वार, साहील हापसे, शुभम कोमटवार, अमोल तायडे, लखन नांगेलवर, आकाश लोणे, अंकुश हापसे, अंकुश अस्वार, नितीन शिंधकडे, पप्पू हापसे, गजनान तायडे, सतीश लांडगे, हर्षल केदार, सूरज दामदर, महेश शिंदकडे, संतोष हापसे, शुभम नंदाने, संदीप हिवरे यांनी परिश्रम घेतले यावेळी ईतर सदस्य व नागरिक बहुसंख्येने सामील झाले होते.
अधिक वाचा : आगामी विद्यापीठ खुल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांची एकत्र येण्याची तयारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola