हिवरखेड (प्रतिनिधी) : भाविकांनी घेतले दर्शन, दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
हिवरखेड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पांडुरंग संस्थान येथे आषाढी एकादशी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटे अभिषेक, काकडा आरती करण्यात आली. दिंडी रात पालखी सोहळा नगरप्रदक्षिणा करण्यात आली. सायंकाळी रिपोर्ट तर रात्री हरीकीर्तन पार पडलं. श्री पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष किशोर बोहरा, अध्यक्ष श्रीराम व्यवहारे, सचिव सत्यदेवराव गिर्हे, यासह सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली. दिवसभरात हजारो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या दिंडीत भजन मंडळ, महिला मंडळ, अबालवृद्धांसह शेकडो भाविकांनी सहभाग घेतला.
आषाढी एकादशी निमित्त सकाळी स्वस्तिक ग्रुप अशोक म्हस्के मित्रमंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दीडशे किलो साबुदाना उसळ चा फराळ भाविकांना वितरित करण्यात आला. यासाठी सर्व सहकार्य स्वस्तिक ग्रुपचे अध्यक्ष अशोक म्हस्के, श्याम तायडे बाळूभाऊ वाकोडे अमोल पिसोळे, राहूल निंबोकार, प्रशांत कुलकर्णी, विजय अस्वार, श्रीकृष्ण अस्वार, गणेश बोपूलकर, विशाल वाकोडे, योगेश गावंडे, देवानंद तायडे, ज्ञानेश्वर माहोकार, भूषण राऊत विलास देऊळकर, आदींनी सहकार्य केले.
लोकजागर मंच तर्फे हि फराळाचे वाटप
लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे नेहमीच वेगवेगळे नाविन्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी लोकजागर मंचने आषाढी एकादशी निमित्त हिवरखेड येथील पांडुरंग संस्थान सोबतच आकोट, मुंडगाव, पिंप्री खुर्द, सावरा, मंचनपूर, कवठा, देऊळगाव, एदलापूर, वाई, अकोली, जहांगीर, अकोलखेड, अडसूळ फाटा, सौन्दळा, माळेगाव बाजार, दानापूर, उकळी बाजार, पाथर्डी, सिरसोली, दहिगाव अवताडे, मनात्री, इत्यादी 22 गावात आणि शहरात फराळ वाटप करण्यात आले. लोकजागरच्या या उपक्रमाचे सर्व विठ्ठल भक्तांनी, वारकऱ्यांनी तसेच सर्वसामान्य लोकांनी, माता-भगिनींनी कौतुक केले. एवढ्या मोठ्या प्रमानावरचा हा उपक्रम यशस्वी करण्यात आकोट आणि तेल्हारा तालुक्यातील तसेच हिवरखेड येथील लोकजागरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : शाळाबाह्य मुलांना घडली शाळेची वारी…. शिक्षणापासुन वंचित सहा आदिवासी मुलांना शाळेत प्रवेश देऊन बनविले शिक्षणाचे वारकरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola