हिवरखेड (दिपक रेळेप्रतिनिधी) : रोजगारासाठी मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात आलेल्या आदिवासी कुटुंबातील 6 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे वारकरी बनवत तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा खंडाळा येथे प्रवेशीत करण्यात आले.
रोजगाराच्या शोधार्थ अनेक आदिवासी कुटुंबे सातपुडा पर्वत रांगातील गावांमध्ये वास्तव्यास येतात. खंडाळा शेतशिवारात शिवा धांडेकर व राम जांभेकर यांच्या कुटुंबातील 6 लेकरं त्यांच्यासोबत शेतातच भटकत राहत असल्याचे बालरक्षक तुलसीदास खिरोडकार यांना समजताच शाळा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून शैक्षणिक सुविधा पुरविण्याचा विश्वास पालकांना दिला व राम जांभेकर, शारदा जांभेकर, लखन जांभेकर, संजना धांडेकर, विशाल धांडेकर, संदीप धांडेकर यांना शिक्षणाचे वारकरी बनवत शाळेत वयानुरुप प्रवेश दिला. यापैकी दोन मुलं कुपोषणग्रस्त दिसतात.त्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, बालरक्षक तुलसीदास खिरोडकार, सुभाष कवठकार, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, कपिल इंगळे, सुरेखा हागे, निखिल गिऱ्हे यांनी शाळाबाह्य मुलांना प्रवेश दाखल करतांना गणवेश व लेखन साहित्य भेट दिले. यावेळी तालुका समन्वयक कमलेश गोसावी, पालक यांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : अकोला : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola