अकोला : पोपटखेड लगतच्या जंगलामधील सलई नदीच्या बाजूला कच्च्या रस्त्यालगत सांबराचे शिंग मुंडक्यासह पडले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे विशेष पथक आणि वन परिमंडळाला मिळाली. या पथकाने सांयकाळी घटनास्थळी भेट दिली. तिथे पथकाला सांबर या वन्यप्राण्याचे मुंडक्यासह शिंग असलेले अवशेष मिळाले. हे अवशेष जप्त करण्यात आले. या सांबराची शिकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अवशेषाची पाहाणी केली असता प्रथमदर्शनी ते कोणत्यातरी हिस्त्र पाण्याने एक वर्षापूर्वी शिकार केल्याचे दिसत आहे. त्याचे वय अंदाजे ४ ते ५ वर्षाचे असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सांबराच्या शिंगाची किंमत अंदाजे दोन लाख रूपये आहे. हे अवशेष एखादया तस्कराच्या हाती लागले असते तर ते विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, पोलीस विभाग व वन विभागाने तात्काळ दखल घेवून हे अवशेष जप्त केले. यावेळी विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकूमार अ. बहोकर, अकोटचे वनपरिमंडल अधिकारी अजय बावणे, वन विभागाचे अधिकारी डी. एम. थावकर, वनपाल पोपटखेड यांची उपस्थिती होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola