अडगांव बु (दीपक रेळे) : वाद कोणताही असो त्यासाठी चर्चा आवश्यक आहे. चर्चातून उपस्थित झालेल्या वादातील मुळापर्यत आपण पोहचु शकतो व त्यातूनच वाद सहज निपटल्या जातात असे मत नव्यानेच रुज झालेले ठाणेदार आशिष लव्हांगळे यांनी आयोजित शांतता समिती च्या बैठकीत व्यत्क केले स्थानीक बालाजी मंगल कार्यालयात सोयायटी अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समिती च्या सभेत ठाणेदार आशिष लव्हांगळे डॉ मनमोहन व्यास, अशोक घाटे, डॉ नबी, संजय राजनकर, पुजाजी मानकर, मंगलसिंग डाबेराव, मो युसुफ, रहेमानसेठ, अफरोजखॉ, श्रीकूष्ण निमकडै, गजानन मुगसे, दिपक रेळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ठाणेदार यांनी अतिसंवेदनशील असलेल्या गावाबाबत ची माहिती शांतता समिती च्या सदस्यासोबत चचो करुन जाणून घेतली गावातील शांतता व सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाल सर्वतोपरी मदत केल्या जाईल अशी ग्वाही उपस्थित सदस्यांनी यावेळी पोलीस विभागाला दिली.
क्रर्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक घाटे यांनी , संचालन पोलीस पाटील हितेश हागे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश पत्की यांनी मानलेत.
अधिक वाचा : बाळापूर न प हद्दीतील रस्त्यांबाबत बाळापूर शिवसेना सरसावली, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola