अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशनानंतर आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 202 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
मागील तक्रारीचे सर्व विभागांनी 90 टक्के अनुपालन केल्यामुळे सर्व विभागाच्या अधिका-यांचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही आपली सामाजिक बांधिलीकी समजुन नागरीकांच्या तक्रारींचे निरासरण करून त्यांना योग्य न्याय दयावा. अशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केल्यात. अर्ध न्यायीक प्रकरणाबाबत वरीष्ठ अधिका-यांकडे अपील करून न्याय मिळवावा किंवा पालकमंत्री यांच्या कडे प्रकरणाबाबत निवेदन दयावे असे त्यांनीही सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सामुहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाच्या अधिका-यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. समता कॉलोनी तुकाराम चौक येथे नव्याने उघडण्यात येणा-या बीअर बार संबंधी नागरीकांनी सामुहिकरित्या निवेदन दिले. नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी नागरीकांनी दिले. अकोला शहरातील प्रभाग क्रं9 मधील वानखडे नगर येथील 2 व जोगळेकर प्लॉट येथील 1 रस्ता तयार करण्याबाबतचे निवेदन नगरसेवक शशिकांत चोपडे व शितलताई गायकवाड यांच्या नेतृत्वात नागरीकांनी दिले. याबाबत महानगरपालीकेला निधी वितरीत करण्यात आला असून लवकरच त्यापरिसरातील कामे सूरू होणार आहे. यासाठी याभागातील नगरसेवकांनी पाठपुरावा करावा असेही त्यांनी सांगितले. मुर्तिजापूर तालुक्यातील विरवाळा येथील शेतकरी हरीभाऊ आसटकर यांच्या शेतात विदयूत पुरवठा सुरळीत नसल्याबाबतचे तक्रार केली असता पालकमंत्री यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना तात्काळ यासंबंधी कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात.
अकोट तालुक्यातील बेलुरा येथील एका कुटूंबाच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे निवेदन बेलुरा येथील शेकडो गावक-यांनी दिलेत. गावक-यांच्या म्हणण्यानुसार गावात जाऊन सत्यता बाबतची पडताळणी करावी व संपुर्ण शहानिशा करून संबंधीतांना न्याय दयावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पोलीस विभागाला दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन अकोट तालुक्यातील वाई ते अंबोडा येथील रस्ता तयार करण्याबाबतचे निवेदन गावक-यांनी दिले.जम्मु काश्मिर येथे शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना मिळण्यात येणा-या सोयी-सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक स्वतंत्र बैठक घ्यावी अशा सुचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्यात. तांदळी खुर्द येथील फासे पारधी कुटूंबातील व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबतचे निर्देश त्यांनी संबंधीतांना दिलेत. काल सर्वोपचार रूग्णालयांत एका छायाचित्रकार यांना मारहाण झाल्याबाबतचे निवेदन सर्व पत्रकारांनी सामुहिकरित्या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना दिले. नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी पोलीस विभागाला दिले. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तक्रारींची दखल घेऊन संबंधीत विभागांना तक्रारीचे निरासरन करण्याबाबत निर्देश दिलेत.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग –58 तक्रारी, पोलीस विभाग—21, जिल्हा परिषद– 43, मनपा-24, विद्युत विभाग –16, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-06, भूमी अभिलेख – 05, कृषी विभाग –04, जिल्हा अग्रणी बँक –03,एस.टी. महामंडळ-1, पाटबंधारे विभाग-05, पीकेव्ही-01, जिल्हा शल्य चिकित्सक-02, जिल्हा विपनण अधिकारी – 2,उ पसंचालक आरोग्य सेवा-02, पाटबंधारे विभाग- 03, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 01, वनविभाग-03, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी- 01, सार्वजनिक बांधकाम- 03, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण-01, जिल्हा शल्य चिकित्सक- 02, जात पडताळणी समिती-02, जिल्हा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क -02, अशा एकुण नविन 202 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
पालकमंत्री यांनी विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारकर्त्यांचे म्हणने ऐकून घेत अधिकाऱ्यांना तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण नविन 202 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी करून विभागवार आढावा घेतला.
या तक्रार निवारण दिनाला उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अभयसिंग मोहिते, रमेश पवार, रामदास सिध्दभट्टी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल तराणीया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण वाघमारे, तहसिलदार गटविकास अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : राहुल गांधी यांच्यावर झालेल्या टीकेच्या निषेधार्थ अकोला काँग्रेस कडून निषेध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola