पुणे (प्रतिनिधी) : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार असल्याचे असे बेजबाबदार विधान करून २३ मृत लोकांचा अपमान केला आहे. खेकड्याला तातडीने अटक करुन ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. तसेच या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील ट्विट करीत सरकारवर टीका केली आहे.
खेकड्याला तातडीने अटक करुन ३०२ चा गुन्हा दाखल करण्याच्य मागणीठी कोल्हापुर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुर येथील शाहुपुरी पोलीस स्टेशनला जाऊन या मागणीची तक्रार देण्यात आली यावेळी कार्यअध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रोहीत पाटील, अदिल फरास, शहराध्यक्ष महेन्द्र चव्हाण व पदाधिकारी उपस्थीत होते.
अधिक वाचा : प्रहार संस्थापक अध्यक्ष मा. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola