अकोला : राष्ट्रीय बचत योजना, किसान विकासपत्रे, सुकन्या योजना आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी. १० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. हे नवे दर एक जुलैपासून अंमलात येतील. या कपातीमुळे पीपीएफ व राष्ट्रीय बचत योजनेवर ७.९ टक्के व्याज मिळेल. तर, सुकन्या समृद्धी योजना व किसान विकासपत्रांवरील व्याज अनुक्रमे ८.४ व ७.६ टक्के असेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आता ८.६ टक्के तर, पाच वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींवर ७.७ टक्के व्याज मिळेल. पाच वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेवींना ७.२ टक्के व्याज लागू होईल.
टपाल कार्यालयातील बचत खात्यांवरील व्याजदर मात्र तेवढाच म्हणजे चार टक्के ठेवण्यात आला आहे.
अधिक वाचा : वाडेगाव येथे गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1