श्रीनगर (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्म-काश्मीर राज्याच्या दौऱ्यावर आहेत पण फुटीरवाद्यांनी बंद पुकारला नाही ! गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे.या पूर्वी जेव्हा जेव्हा गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली, तेव्हा फुटिरवादी नेत्यांनी बंद पुकारला होता. अमित शहा यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी शहा यांनी सुरक्षा आणि विकासाशी संबंधित योजनांसंदर्भात काही बैठका घेतल्या.
काल सुरक्षेशी संबंधित बैठकीत शहा यांनी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरेक्षेची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असून तशा सूचना शहा यांनी सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची ठिकाणे आणि ज्या ठिकाणांहून घुसखोरी होते अशा संवेदनशील ठिकाणावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश शहा यांनी दिले.
कोणत्याही फुटिरतवादी नेत्याने शहा यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी बंद पुकारला नाही, हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य मानले जाते आहे. कोणत्याही फुटिरतावादी नेत्याने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. गेल्या तीन दशकांमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीच्या दौऱ्यादरम्यान फुटिरतावादी बंद पुकारत आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ फेब्रुवारीच्या दौऱ्याच्या वेळी गिलानी, मीरवाइज आणि जेकेएलएफचे प्रमुख यासीन मलिक यांच्या संघटनांनी काश्मीर खोऱ्यात बंद पुकारला होता. १० सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या काश्मीर दौऱ्याच्या वेळीही बंद पुकारण्यात आला होता. अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान मात्र फुटिरतावादी नेत्यांनी मौन पाळले आहे.शहा या दौऱ्यात अमरनाथाचेही दर्शन घेणार आहेत.
अधिक वाचा : टीम इंडियाची भगवी जर्सी; भगवेकरणाचा आरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola