मुंबई : वर्ल्डकप स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालण्याची शक्यता आहे. याचा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक गोष्टीचं भगवंकरण करत असल्याचा आरोप आझमींनी केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे. इंग्लंडच्या संघाच्या जर्सीचा रंगही निळा आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने इंग्लंड वगळता सर्व संघांना जर्सीचे दोन रंग ठेवण्यास सांगितले होते. टीम इंडियाने जर्सीसाठी दुसरा रंग भगवा निवडला. याबाबत अबु आझमी आज विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘टीम इंडिया जिंकते तेव्हा मला आनंद होतो, पण मोदी संपूर्ण देशाला भगव्या रंगाने रंगवू इच्छित आहेत. आज जर्सी भगव्या रंगाच्या केल्या आहेत. मी मोदींना हे सांगू इच्छितो की ज्याने आपल्या तिरंग्याचे रंग निश्चित केले ते नेते मुस्लिम होते. तुम्ही जर्सीसाठी तिरंगा निवडला असता तरी माझी हरकत नव्हती. पण तुम्ही सगळं भगवं करत असाल तर ते अन्याय्य आहे. लोकांनी याचा विरोध करायला हवा.’
भाजप आमदार राम कदम यांनी विरोधक पावसाळी अधिवेशनातल्या मुद्द्यांपासून भरकटत असल्याचा आरोप केला. जर्सीचा रंग खेळाडूंना ठरवू दे, राजकारण्यांना नको, असं कदम म्हणाले. शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘विरोधकांना येत्या विधानसभा निवडणुकांमधील पराभव दिसत आहे, म्हणून ते काहीही बरळत आहेत. भगवा रंग तिरंग्याचाच भाग आहे, म्हणून तो निवडला आहे.’ काँग्रेस आमदार नसीम खान यांनीही अबु आझमींच्या आरोपांचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले, ‘खेळ, संस्कृती, शिक्षण सगळीकडे भगवं राजकारण सुरू आहे.’
अधिक वाचा : मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा दुसरा भारतीय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 2