अकोला (प्रतिनिधी)– विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे पाठ सादरीकरण घेतल्यानंतर त्यामध्ये दहा शिक्षक नापास झाल्याची बाब समोर आली आहे. परीक्षेत १३ पैकी १० शिक्षकांना ५० टक्क्यांपेक्षाही कमी, तर सहा शिक्षकांना ३५ टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी अाता ही फाईल शिक्षण समितीकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अायुष प्रसाद यांनी सोमवारी (ता. २४) दिली.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनामार्फत प्रत्येक वर्षी शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. त्यासोबतच वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भाैतिक सुविधा, पाेषण अाहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येतो. मात्र तरीही जि.प.चा शैक्षणिक दर्जा खासगी शाळा, काॅंन्व्हेंटच्या तुलनेने सुमार आहे. परिणामी शैैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असून, याच प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ७ जून रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत १४ शिक्षकांना पाठाची तयारी करुन येण्याचे सांगण्यात आले होते. या शिक्षकांनी एका समितीसमोर पाठाचे सादरीकरण केले. १० शिक्षकांची कामगिरी असमाधानकरक असल्याचे पेपर तपासणीनंतर पुढे आले आहे.
पाच सदस्यीय समितीने घेतली परीक्षा
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच्या कार्यशाळेसाठी पाच अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात अाली हाेती. समितीसमाेर शिक्षक-शिक्षिकांना पाठाचे सादरीकरण केले. समितीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, संस्थेचे ज्येष्ठ व्याख्याते, मूर्तिजापूर पंचायत समितीच्या विस्तार शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, तेल्हाऱ्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्याचा समावेश हाेता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola