बाळापूर (शाम बहुरूपे) – शहरातील एक अल्पवयीन मुलगी डॉक्टर बनण्याच्या तिव्र महत्वकांक्षा ठेवून घरातून 30,000 रुपये घेऊन पळून गेल्याची अजब घटना उघडकीस आली असून ह्या मुळे समाज मन ढवळून निघत आहे. बाळापूर शहरात राहणारी एक अल्पवयीन हुशार मुलीने नीट परीक्षा दिली होती पण त्या मध्ये वैद्यकीय प्रवेश मिळण्याची शाश्वती नसल्याने तिला नीट रिपीट करण्याची इछा होती परंतु तिच्या आई वडिलांचा ह्या गोष्टीला विरोध होता, त्यांनी तिची Bsc ला प्रवेश घेण्याची तयारी चालविली होती तिने आई वडिलांची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मध्ये तिला यश मिळाले नाही. त्या मुळे ती अस्वस्थ होती, काही दिवसा पूर्वी तिच्या घरा समोर लग्न होते त्या लग्ना मध्ये नागपूर येथून एक समवयस्क तरुणी आली होती, चर्चेत तिने ह्या अल्पवयीन मुलीला तिने सांगितले की तिने नीट रिपीट केली असून ह्या वर्षी तिला चांगले गुण मिळाले आहेत, तिने नागपूर चा स्नेहा कोचिंग क्लास जॉईन केल्याचे सांगितले होते, तेव्हा ह्या अल्पवयीन मुलीने त्या मुली कडून तिचा मोबाईल क्रमांक व स्नेहा कोचिंग क्लासचा पत्ता व संपर्क क्रमांक सुद्धा घेतला, डॉक्टर बनण्याची तीव्र इचछा स्वस्थ बसू देत नसल्याने व आई वडील काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्या मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला घरून 30,000 रुपये व आवश्यक साहित्य घेऊन तिने दिनांक 23।6।19 रोजी सकाळी घर सोडले व ऑटोने शेगाव रेल्वे स्टेशन गाठून गोंडवाना एक्सप्रेसने नागपूर गाठले.
परंतु आयुष्यात पहिल्यांदाच नागपूरला गेल्याने ती भांबावून गेली, तिने ओळख झालेल्या मुलीला फोन लावून स्नेहा कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, तिने तिच्या एका नातेवाईक मुलाला पाठवून तिला कोचिंग क्लास मध्ये 15,000 रुपये भरून प्रवेश मिळवून दिला व मुलींच्या हॉस्टेल मध्ये सुद्धा प्रवेश मिळवून दिला, परंतु तिच्या मोबाइल वर घरच्यांचे सारखे फोन सुरू होते व घरच्या लोकांनी बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये मुलगी घरून निघून गेल्याची व चिठी लिहून डॉक्टर बनण्यासाठी घर सोडल्याचे नमूद केल्याचे सुद्धा सांगितले प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी तिच्या मोबाइलचे लोकेशन घेतले असता ते नागपूर चे असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्या नातेवाईकांना तेथील नातेवाईकांसोबत संपर्क साधण्यास सांगितले परंतु नागपूरला कोणीही जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांनी तिच्या डायरी मध्ये नोंदविलेल्या स्नेहल नावाच्या नागपूरच्या मुली सोबत संपर्क साधला असता तिने सदर मुलगी नागपूरला आली असून तिने स्नेहा कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेतला असल्याचे सांगितले. त्या नंतर बाळापूर पोलीस व मुलीचे नातेवाईक हे नागपूरला रवाना झाले, दरम्यान नातेवाईकांचे वारंवार येणाऱ्या फोन मुळे सदर अल्पवयीन मुलगी घाबरली व तिने नंदनवन पोलीस स्टेशन गाठून त्यांना सर्व हकीकत सांगितली तो पर्यंत बाळापूर पोलीस व तिचे नातेवाईक तेथे पोहचून त्यांनी तिची समजूत घालून तिला परत आणून बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे समोर उभे केले असता त्यांनी तिचे समुपदेशन करून तुझ्या डॉक्टर बनण्याच्या महत्वकांक्षा चे आड आई वडील येणार नसल्याची तिची खात्री पटवून तिचे आई वडिलांना सुद्धा समजावून सांगितले , सदर मुलीचा शोध घेण्यासाठीपोलीस निरीक्षक गजानन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रजा क, नागरे ह्यांनी परिश्रम घेतले, नमूद घटने मधून सध्या पालक आणि मुले ह्यांच्या मधील संवादाच्या अभावी मुले किती घातक निर्णय घेऊ शकतात हे अधोरेखित होते.
अधिक वाचा : तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा अडगाव बु येथे संपन्न !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola