अडगाव बु (दीपक रेळे)– शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान भांडाऱ्याची सुरवात 10 जून पासून अकोली जहागीर येथून सुरू झाली. अकोली जहागीर येथे सर्वप्रथम शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बाहाळे यांच्या शेतात उघड HT Bt ची लागवड करून किसान सत्याग्रह आणि ‘माझं वावर माझीच पावर’ हे आंदोलन करण्यात आले. याला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्व जिल्हामध्ये शेतकरी हे आंदोलन राबवत आहेत .अकोला जिल्हामध्ये अकोली जहागीर नंतर याला प्रतिसाद देत स्वतः जाहीर करून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाच आंदोलन करून शेतकऱ्यांनी HT Bt ची जाहीर लागवड केली. या सर्व आंदोलनाच्या वेळेस सर्व कृषी खात्याचे शासकीय अधिकारी घटना स्थळावर उपस्थित होते. अडगाव बु येथे शेतकरी संघटने तर्फे तंत्रज्ञान स्वातंत्र्य भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तंत्रज्ञानने शेतकऱ्यांच्या जीवनात कोणकोणते बदल होऊ शकतात ते सांगण्यात आले.
दिवसेंदिवस शेती वर भार वाढत असून दोन चार एक्कर मध्ये परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. म्हणून शेतीला तंत्रज्ञान ची जोड मिळाल्यास शेतीवरील उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होऊन उच्च दर्जेची गुणवत्ता निर्माण होणार आहे. परंतु शासन शेतकऱ्यांचे दार वाजवत असून शासन विनाकारण तंत्रज्ञान वर बंदीचा अट्टाहास करीत आहे. मागील नऊ वर्षांपासून शासनाने तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेणे बंद केले आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळत नाही. HT Bt वर बंदी असल्याने लागवड केलेले बियाणे हे HT Bt आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री शेतकऱ्यांना देता येत नाही. तंत्रज्ञान हे चोर वाटेने न येता उघड मार्गाने यावे या करिता शासनाने तंत्रज्ञाना वरील बंदी उठवावी या मागणी करिता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक होऊन या आंदोलना पाठिंबा आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मोकळे करण्याकरिता जाहीर करून HT Bt हे कपाशीचे वाण आपल्या शेतात लागवड करीत आहे. शासकीय सर्वेक्षनानुसार मागील वर्षी दहा लाख हेक्टर वर HT Bt ची लागवड महाराष्ट्रात लागवड झाली होती. जर का महाराष्ट्रात एवढया मोठ्या क्षेत्रावर HT Bt ची लागवड होत असेल तर हे तंत्रज्ञान चांगले असण्याची शक्यता आहे म्हणून शासनाने बंद केलेल्या चाचण्या पुन्हा सुरू कराव्या अशी मागणी शेतकऱ्याकडून जोर धरत आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी संघटनेचे माहिती तंत्रज्ञान आघाडी चे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या शेतात तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा घेऊन HT Bt लागवड करण्यात आली. यावेळी गावातून शेतापर्यंत शेतकरी संघटनेची तंत्रज्ञान स्वातंत्र्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग दर्शविला. या कार्यक्रमात गावागावातून पाचशे शेतकरी एकत्र झाले होते.या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी सीमाताई नरोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अनिल घनवट यांनी शेतकऱ्यांना संबंधित केले की शासन हे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळण्याबाबत अडवणूक करीत आहे. जगात कृषी क्षेत्राकरिता तंत्रज्ञान मोकळीक आहे पण येथील शेतकऱ्यांना ते मिळू नये .असे प्रयत्न सरकार करत आहे. HT Bt उत्पादन खर्चात बचत होते .सरकार ने लवकरात लवकर BT च्या चाचण्या न घेतल्यास शेतकरी त्या चाचण्या वैधनिकांची मदत घेऊन आपल्या शेतावर करतील.
पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी च्या अध्यक्षा सीमा ताई नरोडे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकऱयांच्या मुलांनी राजनैतिक लोकांच्या मागे न लागता शेती वेवसाय कसा वाढेल यावर लक्ष केंदित करावे अस बोलत होत्या. शेतकरी संघटनेचे ललित दादा बाहाळे यांनी HT Bt ही तंत्रज्ञान मिळवण्याकरिता पहिली पायरी असून अख्या जगात जे कृषी क्षेत्रात जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांना मिळावे हा त्यांचा हक्क आहे. हा प्रश्न निव्वळ शेतकऱ्यांचा नसून त्याच्या येणाऱ्या पिढी च्या भविष्याचा विषय आहे असे मत वक्त केले. शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सतीश देशमुख यांनी शेती ही कोणत्याही जातीच्या शेतकऱ्यांची फायद्याची राहिलेली नाही म्हणून सर्व जात पात धर्म पक्ष सोडून सर्वन्नी एकत्र येण्याचे आव्हान केले. अमरावती जिल्हातील शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजाभाऊ पुसदेकर यांनी शेती विरोधी कायदे रद्द करण्याकरिता शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आव्हान केले.या कार्यक्रमात माया पुसदेकर शेतकरी संघटना अडगाव बु चे सरपंच मंगलसींग डाबेराव, तेल्हारा तालुका युवा आघाडी चे निलेश नेमाडे, शेतकरी संघटनेची अकोट तालुका महिला आघाडी प्रमिला भारसाकळे,अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, अकोट तालुका युवा आघाडी विक्रांत बोन्द्रे,दिनेश गिर्हे, दिनेश देऊळकार, मंगेश रेळे, सुरेश सोनोने, गोपाल निमकर्डे, संजय ढोकणे, महेश उमाळे, अमोल मसुरकर, मोहन खिरोडकार ,विलास इंगळे, गणेश इंगळे, जाफर खा, शेख इस्माईल,व समस्त शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच धीरज खिरोडकार, देविदास ढोकणे, शेख आरिफ,गजानन देशमुख, प्रशांत बहाकार, माजी सरपंच अशोक घाटे,पत्रकार माणिक घाटे ,पत्रकार निलेश पत्की,पत्रकार पुरुषोत्तम निमकर्डे,पत्रकार दिपक रेळे , पत्रकार अकोट व अकोला, तेल्हार पत्रकार मंडळी उपस्थित होते.
अधिक वाचा : आज पुन्हा एकदा तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा, अडगाव बु. येथे HT Bt लागवड करून सविनय कायदे भंग आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola