अकोट (देवानंद खिरकर) : अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातुन 17 वर्षाची मुलगी सोबत एक 17 व 23 वर्षांचे दोन तरूण असे गावातुन बेपत्ता झाले. बाबतची तक्रार आल्याने पो. स्टे. अकोट ग्रामीण ला 16/07/2019 रोजी भादवी 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाची हकीकत अशी होती की बेपत्ता मुलगी ही 16 जुन रोजी अकोट शहरात मैत्रीणीसोबत संगणक क्लासला म्हणुन आली होती. ती संध्याकाळपर्यत घरी न परतल्याने तिचा सर्वञ शोध घेतला असता ती व गावातील एक अल्पवयीन मुलगा व रविंद्र झगडे हा सुध्दा बेपता असल्याचे आढळुन आले.
त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलीला या दोघांनी फुस लावुन पळवुन नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली. या फिर्यादीचे दरम्यान अल्पवयीन मुले विषेश मोहीम जिल्हा पोलीस अधिक्षक राकेष कलासागर यांनी सुरू होती. त्यामुळे दोन्हीही अल्पयीन मुलगी व मुलगा एका सज्ञान तरूणासोबत बेपत्ता असल्याने ही बाब जिल्हा पोलीस अधिक्षक सांगताच त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन सखोल तपास करावा, मुलगी अल्पवयीन असल्याने काही विपरित घटना घडण्याआधीच षोध घेण्याचे आदेष दिले. परंतु बेपत्ता असलेल्या तीघांकडेही मोबाईल फोन नसल्याने त्यांचा शोध घेण्याचे पोलीसासमोर आव्हान होते. तपासकामी दिषा मिळत नसताना अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना सदर गुन्हयाची पाष्र्वभुमीवर तपास करून तीन्ही बेपत्ता मुले हे राज्याबाहेर एकत्र निघुन गेल्याचे निस्पन्न झाले. दरम्यान पळुन गेलेले मुले हे सुरवातीला गुजरात मधील वापी या ठिकाणी असल्याची माहीती मिळाली म्हणुन या ठीकाणी गा्रामीण पोलीसांचे पथक पोव्हचण्यापुर्वीच ते राजस्थान मधील उदयपुर जवळ असल्याची माहीती मिळाल्याने तात्काळ त्या ठिकाणी अकोट ग्रामीण चे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोव्हचले या परिसरात या मुलांचे फोटो दाखवुन नमुद बेपत्ता मुले ज्या घरात आहेत. त्या ठीकाणी धाड टाकुन तिघांनाही ताब्यात घेउन पोस्टे अकोट येथे दि. 22.06.19 रोजी संध्याकाळी आणण्यात आले. ठिकाणी त्यांना विचारपुस केली असता सदर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीश देवुन तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने फुस लावुन पळवुन नेले. तसेच तिच्यावर या कालावधीत लैंगीक अत्याचार केले याकामी त्याला त्याच्या सोबत असलेल्या रविंद्र झगडे यांनी सुरवातीपासुन सहकार्य केले.
या प्रकरणी अकोट गा्रमीण पोलीसांनी एक विधीसंघर्शग्रस्त मुलगा व रविन्द्र झगडे याच्याविरूध्द नमुद गुन्हयात कलम 366 अ, 376 (2) एन, भादवी सहकलम 3 अ, 4 पोक्सो कायदयाची वाढ केली आहे. या प्रकरणी पिडीत मुलीची व विधिसंघर्शग्रस्त मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या कायदेशीर पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. व आरोपी रविन्द्र वसंतराव झगडे वय 23 वर्ष यास अटक केली आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक श्री एम राकेष कलासागर साहेब, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री विक्रांत देषमुख साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल सोनवने साहेब यांच्या मार्गदर्षनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, पोउपनि सुवर्ना गोसावी, ए.एस.आय. नारायण वाडेकर, गजानन भगत, अनिल शिरसाट, प्रविण गवळी व नंदु कुलट यांनी केली तसेच तपासकामात पिडीतांच्या नातेवाईकांनी सुध्दा चांगले सहकार्य केले व बेपत्ता मुलीला षोधुन झाल्याबद्दल अकेाट ग्रामीण पोलीसांच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या गुन्हयाचास पोलीस सखोल तपास करत आहेत.
अधिक वाचा : अल्पवयीन मुलीवर अडीच महिन्या पूर्वी झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली, बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola