बाळापूर(प्रतिनिधी)– उरल पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिचेच नातेवाईक असणाऱ्या एका तरुणाने अडीच महिन्या पूर्वी बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये केलेल्या अत्याचाराला वाचा फुटली असून आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या बाबत मिळालेल्या माहिती प्रमाणे दिनांक 6।4।19 रोजी उरल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी तिचे चुलत वहिनी सोबत बाळापूर येथे उपचार कामी रुग्णालयात आली असता दवाखाना बंद असल्याने चुलत वाहिनीने तिला तिचे माहेरी बटवा डी येथे नेले. तेथे थोड्या वेळ थांबल्या नंतर तिने तिचा भाऊ विनिश ह्याला सदर मुलीला मोटारसायकलने तिचे गावी सोडण्यास सांगितले. त्याने अल्पवयीन मुलीला मोटारसायकल वर बसवून गावी सोडण्यास नेत असतांना गावाचे बाहेर 1 किलोमीटर आल्यावर तिला रोडचे बाजूचे झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व कोणाला सांगितले तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी देऊन नंतर तिला तिचे घरी सोडून दिले. धमकी मुळे सदर मुलीने ही गोष्ट कोणालाही सांगितले नाही.
त्यानंतर सुमारे अडीच महिन्या नंतर सदर अल्पवयीन मुलीचे निसर्ग चक्र चुकल्याने तिचे आईने तिला ह्याबाबत विचारपूस केली असता तिने संपूर्ण हकीकत आईला सांगितली. त्या नंतर अल्पवयीन मुलीचे नातेवाईकांनी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांची भेट घेऊन सदर हकिकत सांगितली. पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस करून त्वरित बलात्कार व पोक्सो कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील , पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिता इंगळे पुढील तपास करीत आहे. आरोपी गावात हजर नसल्याने अटक कार्यवाही झाली नाही.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी व सीईओ यांनी गाठला हिवरखेडचा सरकारी दवाखाना, गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी केली चौकशी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola