अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील पणज, वडाळी देशमुख परिसरात शहापुरबृहत प्रकल्पाअंतर्गत धरण नदीपात्रात अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती नुसार धरण अधिकारी व अकोला गौणखनिज पथकाने 19 जुन रोजी छापा टाकला. यावेळी रेतिचे उत्खनन करनारे पळून गेले. धरण पत्रात स्वंशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या दोघाविरुध गुन्हा दाखल केल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दीली.
अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेति उत्खनन करुन गौणखनिजाची वाहतुक सुरु असतांना अकोट महसूल विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे या कारवाई वरुन स्पष्ट हित आहे. विशेश म्हणजे या कारवाईच्या दिवशी अकोला जिल्हाधिकारी हे अकोट दौर्यावर होते.अकोट तालुक्यातील पणज या गावाजवळून वाहनार्या पठार नदीवर लघू पाटबंधारे योजनेंतर्गत शहापुरबृहत या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रक्लपाकरीता शासनाने 261 कोटी रुपये खर्च करुन धरणाची निर्मिती केली आहे.या धरणाची लंबी 55.10 मिटर व उंची 17.23 मिटर असुन धरणाची एकुण साठवनुक शमता 2.790 द.ल घ.मी.आहे. पिण्याच्या पाण्या करिता, सिंचन व औधोगिक वापराकरिता आरक्षित करण्यात आले आहे. सदर धरणात पाणीसाठा न झाल्याने व गाळ असल्याने रेति माफियांनि अवैद्य उत्खनन सुरु केले आहे. या प्रकारामुळे धरण परिसराला धोका निर्माण झाला आहे. धरण पात्रात अशरशः 20 ते 30 फुट खोल खड्डे करुन रेतिचे उत्खनन सुरु केले. या बाबतची माहिती मिळताच अकिला पाटबंधारे विभाग अधिकारी अविनाश कुंभारे व अकोला खनिकर्म विभागाचे अधिकारी यांनी 19 जुन रोजी धरण पात्रात तपासणी करिता छापा टाकला. यावेळी रेतिचे उत्खनन करणारे पळून गेले.या ठिकाणावरुन गाढवांच्या पाठीवर रेतिची वाहतुक करीत आढळून आले. पथकाने अब्दुल व भारसाकळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. त्यांच्या विरुध अकोट ग्रामीन पोलिस स्टेशनला 109 सीआरपी नुसार गुन्हा दाखल केला.
अधिक वाचा : अकोट महसुलचा भोंगळ कारभा अंधेरी नगरी चौपट राजा, जनता दरबारातील पालकमंत्री साहेब यांच्या आदेशाला दिला ‘खो’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola