मुंबई : भाजप- शिवसेनेतील श्रेयवादावरून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फुटला, असा आरोप करत विरोधी पक्षांनी अर्थसंकल्प फुटीची सायबर क्राइमकडून चौकशी करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प फुटल्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारला आज विधानसभेत धारेवर धरलं.
फुटलं रे फुटलं, बजेट फुटलं, ट्विटरवर बजेट फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, प्रसिद्धीसाठी हापापलेल्या मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांचा धिक्कार असो, फुटलेल्या बजेटची सायबर क्राइमकडून चौकशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं.
अधिक वाचा : अकोट ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची असभ्य वागणूक,नागरिकांनी केली कारवाईची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1