अकोला (प्रतिनिधी)– जिल्ह्यामध्ये सतत चार वर्षापासून दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे व यावर उपाय म्हणून राज्य शासनाने 2017 मध्ये शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून कर्जमाफीची योजना राबवली परंतु बराच कालावधी उलटून सुद्धा या योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी हे वंचित आहेत व या योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून अजून देखील काही शेतकरी बँकेत चकरा मारीत आहेत. यामध्ये बँकेत चालू खातेदार असणाऱ्याचं शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात व इतर शेतकरी मात्र या योजनेपासून वंचित ठेवण्याल्याचे चित्र दिसते आहे. यामुळे बँकेचे देणे आणि खाते थकित झाले असून यावर व्याजाचा बोजा वाढल्याने रक्कम अधिक वाढली आहे अशा परिस्थितीत बँका देखील शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याने पेरणीचे दिवस जवळ आले असताना पेरणीसाठी पैसा कसा उभा करावा हे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे याकरता जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत शेतकरी या कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकणार नाही असे आमचे मत आहे.
तसेच शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अमलात आणली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली व प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार असे पैसे येणार होते व जिल्ह्यात या हप्त्याचे वाटप सुध्दा झाले असून या योजनेचा देखील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. यासंदर्भात अनेक शेतकरी बँकेत जाऊन चौकशी करत असून मात्र बँक कर्मचाऱ्यांकडून त्यांना समाधान कारक असे उत्तर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. याचबरोबर 2018-19 च्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु अजूनही शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही मुळात “पिक विमा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी का कंपनीच्या फायदासाठी” हा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन पीक विम्याची रक्कम अदा करावी अश्या आशयाचे निवेदन जिल्हा अधीक्षक अकोला यांना अखिल भारतीय कुणबी युवा मंच संघटना च्या वतीने देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर आंदोलने करण्यात येतील असा सूचक इशारा देखील कुणबी युवा मंचच्या वतीने शासनाला देण्यात आला. यावेळी कुणबी युवा मंचचे अध्यक्ष माणिक शेळके, तुषार डांगे, स्वप्नील अहिर, बाळू ढोले, विनायक टिकार, महेश गोरे, गोलू मुळे, अक्षय आखरे, सुशील ठाकरे, बाळकृष्ण दांदळे, शिवा महल्ले, अविनाश मातळे, राजेश्वर वाकोडे, आनंद गाढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : अर्थसंकल्प फुटीची चौकशी करा, विरोधकांची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola