अकोट( देवानंद खिरकर )- आज दिनांक १७ जून रोजी शिवसेना नगरसेवक यांना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या असुविधेमुळे त्रस्त रुग्णांनी फोनवर रुग्णालयातील समस्यांबाबत सर्व माहिती दिली.त्यावर क्षणाचाही विलंब न करता शिवसेना गटनेता मनिष रामभाऊ कराळे यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पीडित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या व तात्काळ ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी गौरव गोस्वावी यांची भेट घेण्यासाठी गेले असता डॉ.गौरव गोस्वामी हे ड्युटीवर असतांना मध्यधुंद अवस्थेत आढळून आले व त्यांनी आज रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा दिली नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली.हा ग्रामीण रुग्णालयातील सर्व ढासळलेला नियोजनशून्य प्रकार पाहून मनिष कराळे यांनी जिल्हा चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांच्या कानावर संबंधित प्रकार दूरध्वनी वरून कळविला.व जनभावना लक्षात घेऊन अकोट ग्रामीण रुग्णालयासाठी खालील मागण्या केल्या डॉ.गौरव गोस्वावी यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना कार्यमुक्त करावे,डॉ.सौ.मीनल पवार यांना MS हा कार्यभार सोपवावा,रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी,तसेच सर्व कर्मचाऱ्यांची आढावा सभा घ्यावी,कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून मेडिसिन आणायला लावू नये,रुग्णालयातील एक्सरे मशीन दुरुस्त करण्यात यावी,डिलिव्हरी महिलांसाठी रुग्णालयात शिजर सुविधा सुरू करण्यात यावी तसेच इतर सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे अशा विविध मागण्या केल्या असता त्यावर डॉ.चव्हाण यांनी या घडलेल्या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला येथील आपल्या विभागातील निवासी डॉ.पवार यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवून याप्रकरणी चौकशी करण्याचे व संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले तसेच यामध्ये कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.व रुग्णालयात वरील सर्व मागण्यांनुसार सर्व सुविधा लवकरच देण्यात येतील असे मौखिक आश्वासन दिले तसेच योग्य रुग्णसेवा देण्याची हमी दिली.