पिंजर(प्रतिनिधी)– आज बारा वाजताच्या दरम्यान दोन मुलांना हा कुत्रा चावला तेव्हा हा विषय कोणाच्याही लक्षात आला नाही. मात्र येथील अय्याज शे.रमजान याला कुत्र्याने चावा घेताच शे.रमजानभाई यांनी लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सांगितले तेव्हा लगेच दीपक सदाफळे यांनी डाॅग कॅप्चर स्टिक घेऊन बागवान पु-याकडे धाव घेतली तर एवढ्यातच बागवान पु-यातील शे.सोपिहानला या कुत्र्याने मांडीला जोरदार चावा घेतल्याने लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
दुपारी बारा वाजतापासुन तर चार वाजेपर्यंत एकुण नऊमुलांना या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली.लगेच दीपक सदाफळे यांनी गावात पिसळलेला पांढ-या रंगाचा एक कुत्रा फिरत असल्याची माहिती व्हाटसपवर टाकुन नागरिकांना सावधान केले. तेव्हा हा कुत्रा पिसळलेला असल्याची खात्री झाली आणी लगेच मस्तानशा डीपी जवळ या कुत्र्याला नागरिकांनी ठार केले. फटाफट सर्व जखमिंना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे साहेबांनी सर्व जखमिंना A.R.V. लस देऊन पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले. कारण अशावेळी A.R.S. लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेने अंकुश सदाफळे,मयुर जवके,अमोल बोळे,यांनी सर्व जखमींना उपचारासाठी अकोला येथे नेले. जखमीपैकी शे.अय्याज शे. रमजान, वय. (35) प्रतु विजय नवलकार, वय. (9) हुसेन शे. ईरफान, वय. (11) अब्राहम आरीफखान, वय.(9) अक्षरा राजेश वानखडे, वय.(6) शे.सोफीहान शे.ईरफान, वय.(8) शे.फरहान शे.करीम, वय (8) सर्व रा.पिंजर यांना नेण्यात आले. हा कुत्रा एवढा पिसाळला होता की दिसेल त्याला चावण्या प्रयत्न तो करत होता. पाच मुलांना या कुत्र्याने चार-पाच ठीकाणी चावा घेताला आहे. यामुळे यांना अकोला येथे पुढील लस देण्यासाठी पाठविले.
अधिक वाचा : कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत उतरलेला जादूगार गायब