अकोला (प्रतिनिधी) : येणारे पुढील काही महिने शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असुन त्यांना पिक कर्ज, बी-बियाणे, खते, किटकनाशके आदी कामात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयांनी कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात विविध विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, पिक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतक-यांना बँकानी त्वरीत कर्ज वाटप करावे असे सांगून शासन स्तरावर शेतक-यांच्या किरकोळ कामासाठी शेतक-यांना अधिका-यांनी सहकार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. शेतक-यांना पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बि-बियाणांचा तसेच खते व किटकनाशकांचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध करून दयावा. अकोला जिल्हयाकरीता 137 कोटी रूपयाचा दुष्काळ निधी प्राप्त झाला असुन त्याचे शेतक-यांच्या खात्यात त्वरीत जमा करावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. पाटील यांनी दिलेत. बोगस बियांणे व खतासंबंधी तक्रारी असल्यास त्यावर त्वरीत कडक कार्यवाही करावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी पथक तयार करून काळा बाजार करणा-या विरूध्द धडक कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिलेत.
जिल्हयात चारा टंचाई निर्माण झाली तर त्यावर त्वरीत कार्यवाही करता यावी यासाठी महसुल मंडलनिहाय किती चारा उपलब्ध आहे याची अदयावत माहिती ठेवण्याच्या सुचना पशुसंवर्धन विभागाला पालकमंत्री यांनी दिल्यात. जिल्हयातील दुष्काळी परिस्थीतीचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार अकोला शहराला 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा महान धरणात उपलब्ध आहे. व पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जिल्हयात 400 दिवस पुरेल इतका चारासाठा उपलब्ध आहे. जिल्हयात 41 टँकर व्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून काही ठिकाणी विहिर व बोअरवेल अधिग्रहीत करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरची मागणी गावाकडून येताच त्यांना खातरजमा करून पाणी पुरवठयासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाणी पुरवठयाचे सुक्ष्म नियोजन केल्यामुळे पाणी टंचाईच्या तक्रारी कमी झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली.
प्रधानमंत्री घरकुल योजनेतून नवीन तयार झालेल्या 2500 घरकुलांना महावितरण कंपनी कडून दिनदयाल उपाध्याय उजाला योजनेत विज कनेक्शन, उज्वला योजनेतून स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन प्राधान्य क्रमाने उपलब्ध करून दयावे असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागांना दिलेत. सांस्कृतिक भवनासाठी फर्निचर, विदयूतीकरण, कंपाऊड वॉल, स्विमींग पुल आदींसाठी अतिरीक्त 15 कोटी रूपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, येत्या ऑगष्ट महिन्यात येणा-या कावड यात्रेसाठी अकोला ते गांधीग्राम हा रस्ता एका बाजुने पुर्ण करून कावड यात्रेकरूसाठी उपलब्ध करून दयावा असे निर्देश त्यांनी संबंधीताना दिलेत. येत्या 15 दिवसात नेकलेस रोडवरील इलेक्ट्रीक पोल शिफ्टींगचे काम पुर्ण करून तेथे वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून ऑड – इव्हन पार्किंग व्यवस्था सुरू करावी अशा सुचना संबंधीत विभागाला पालकमंत्री डॉ. पाटील यांनी दिल्यात.
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था बाबतीत ऍन्टीकरप्शन विभागाने केलेली कामगीरी कौतुकास्पद असुन गौण खनीज वाहतुकीबाबत पोलीस विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता कडक कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी पोलीस विभागाला दिलेत. वाळूच्या अवैध उत्खंलन्न व अवैध वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र पथक तयार करावे अशासुचना त्यांनी दिल्यात. वाळू घाट लिलावाच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी संबंधीत विभागाला दिलेत.
आज झालेल्या आढावा बैठकीत दुष्काळ, पाणीटंचाई, कृषीपंप जोडण्या, पिककर्ज, प्रधानमंत्री आवास योजना, बि-बियाणे व खते यांची उपलब्धता, रत्यांची कामे, कायदा व सुव्यवस्था व इतर सर्व महत्वांच्या विषयांचा संक्षित्प आढावा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतला.
या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरूण वाघमारे, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता पवन कुमार कछोटसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा : एस एस सी मार्च परीक्षेत सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड चे सुयश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola