अकोला (प्रतिनिधी): यंदा रासानिक खतांचे मागील वर्षीपेक्षा प्रचंड भाव वाढल्याने शेतकर्यांचे आर्थीक गणीत कोलमडल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
अकोला जिल्हयात सध्या दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गतवर्षी समाधानकारक पीक न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यात पीककर्जासाठी अर्ज करूनही अनेक शेतकर्यांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर खरिपातील पिकांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन खर्चही वाढणार आहे. ही बाब ऐन दुष्काळात शेतकर्यांची चिंता वाढवणारी ठरणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीची कामे आटोपून घेतात. त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असते. साधारण २२ मे नंतर शेतकरी खते व बियाण्यांची खरेदी करतात. उत्पादन चांगले मिळावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
सध्या कृषी सेवा संचालकांनी खतांचा व बियाणांचा साठा करून ठेवणे सुरू केले आहे. त्यातच खत कंपन्यांनी दरवाढ केली आहे खत उत्पादक कंपन्यांनी खतांमध्ये ५० किलोच्या बॅग मागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेती पिकांचे उत्पादन खर्चही वाढणार आहे. त्या तुलनेत कोणत्या कोणत्या पिकाला अपेक्षित भाव मिळेल याचीही चिंता शेतकर्यांना लागली आहे.
अधिक वाचा : ब्रेकिंग- तेल्हारा येथे ६० वर्षीय इसमाचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1