अकोला (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडने आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी जोरात सुरु केलेली आहे. निवडक १०० मतदारसंघांध्ये विधानसभेचे उमेदवार उभे करण्याचा निर्धार असल्याची माहिती प्रदेश संघटक व मुंबई संपर्क प्रमुख कपिल ढोके यांनी दिली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व प्रदेश महासचिव यांनी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राचा सुद्धा दौरा पूर्ण केला आहे या दौऱ्यादरम्यान ठरावीक व निवडक शंभर मतदारसंघांमध्ये संभाजी ब्रिगेडचे उमेदवार तयारी करत असून निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेडने उमेदवार उभे करतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव व दारूमुक्त गाव हे ब्रीद त्याच प्रमाणे व्यवस्था परिवर्तनाचा उद्दिष्ट घेऊन कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱयांच्या बहूजनांच्या मुलांना विधानसभेत प्रवेश मिळावाच हे धेय समोर ठेवले आहे.राजकीय तडजोडी करत असतांना युती आघाडीचा पर्याय सुद्धा संभाजी ब्रिगेडसमोर खुला आहे.”अनेक पक्षांकडून संभाजी ब्रिगेडला ऑफर्स आल्याची माहिती सुद्धा कपिल ढोके यांनी दिली आहे.
“याबाबत बोलणी सुरू आहेत. त्या बोलणीतून काही तडजोड झाल्यास युती किंवा आघाडी सुद्धा केली जाईल. परंतु संभाजी ब्रिगेडने स्वबळावर शंभर विधानसभेच्या जागा लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र दौऱ्यातून उमेदवारांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड प्रमाणात वाढला आहे. उमेदवारांची तयारी व मतदारसंघातील संपर्क सुरू असून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,” असेही कपिल ढोके यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रस्थापित पक्षांकडून संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, येत्या महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात येईल व महिनाभराच्या आत संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अधिक वाचा : रासायनिक खतांचे भाव वाढल्याने, बळीराजा चिंताग्रस्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola