अकोट (दिपक रेळे) : आज अकोट शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील अवैध धंदे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल प्रभागातील शेकडो महिला तसेच रहिवाश्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन दिले निवेदन.निवेदनात मनिष कराळे यांनी प्रभागाच्या वतीने खालीलप्रमाणे समस्या मांडल्या -प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्व जाती धर्माचे लोक गेली कित्येक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत.त्यामध्ये जास्तीत जास्त रहिवासी वर्ग हा मोलमजुरी मेहनत करणारा आहे.
प्रभागातील रिलायन्स पेट्रोल पंम्प च्या मागे गेली कित्येक वर्षांपासून अवैध धंदे व वेश्या व्यवसाय चालतो त्यामध्ये या ठिकाणी शहरातील तसेच बाहेर गावावरून हा व्यवसाय करण्याकरिता मुली आणल्या जातात त्यामुळे या परिसरात दररोज सायं आंबट शौकिनांची गर्दी असते यासोबतच या ठिकाणी इतर अवैध धंदे या व्यवसाया सोबत चालवले जातात ज्यामुळे या प्रभागात लूटमार, मारामारी, जीवघेणे हल्ले अशा गंभीर घटना घडत असतात त्यामुळे या प्रभागातील सर्वसामान्य नागरिक हा त्रस्त झाला आहे त्यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग हा अतिशय संतापलेला आहे.
याबद्दल अनेकदा पोलीस मध्ये तक्रार करून सुद्धा हे प्रकार सुरूच आहेत.या परिसरात शाळा,महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थ्यांची दररोज ये जा असते परंतु वरील प्रकार हा सुरूच असल्याने आता पालक वर्गामध्ये आपल्या पाल्याच्या सुरक्षेविषयी चिंता काळजी निर्माण झाली आहे.वरील सर्व प्रकारामुळे सर्व प्रभागातील रहिवासी आता वैतागले असून हे सर्व प्रकार लवकरात लवकर बंद व्हावे याबद्दल पोलीस व प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी मागणी प्रभागातील व परिसरातील विध्यार्थी, विद्यार्थिनी,महिला तसेच सर्वच स्तरातून होत आहे.
जर हे सर्व अवैध धंदे लवकरच बंद झाले नाही तर महिला व रहिवासी या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडतील अशा आशयाचे निवेदन आज अकोट पोलीस स्टेशन ठाणेदार यांना मनिष कराळे यांनी दिले व त्यावर ठाणेदार साहेबांनी हे सर्व अवैध धंदे व वेश्या व्यवसाय बंद करू व संबंधितांवर योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले.यावेळी उपस्थित शेकडो महिला व नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.
अधिक वाचा : संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने मंगरुळपीर येथिल नागरिकांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola