अकोला(प्रतिनिधी)– संपूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळी कुठे आपत्ती येथे तिथे एका आवाजावर दखल घेत आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी दाखल होणाऱ्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने आज मंगरूळपीर येथील नागरिकांना पोलीस ठाण्यात माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. यावेळी मुख्य अतीथी ठाणेदार रत्नपारखी साहेब, ना.तहसीलदार जाधव साहेब, कुळकर्णी साहेब आणी प्रशिक्षणासाठी आलेले विवीध विभागातून शासकीय तथा नीमशासकीय कार्यालयीन प्रतिनिधी आणी मंगरूळपीरसह तालुक्यातील पोलिस पाटील, सरंपच,तथा अन्य नागरीक मोठया प्रमाणात हजर होते. यावेळी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक,पिंजरचे दीपक सदाफळे हे होते. यामध्ये पुर, आग, सर्पदंश, अपघात आणी आपत्ती व्यवस्थापन आणी आपत्ती निवारणा विषयी उपाययोजना व आपत्कालीन घटनांविषयी करावयाच्या कार्यवाही या संबंधित योग्य मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करून दाखवले व शोध व बचाव साहित्याची ओळख आणी त्याला हाताळण्या विषयी माहिती सांगीतली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola