अकोला (प्रतिनिधी) : आज मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला ह्यांना निवेदन देण्यात आले की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत येत असलेल्या अभियांत्रिकी शाखेतील मेकँनिक्स ह्या विषयाचा 29 मे रोजी पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला. ह्यामध्ये परीक्षा विभागातील स्पायरल बाईड या खाजगी कंपनीच्या स्थित कार्यरत असलेले आशिष राऊत व विनय रोहणकर संमती अभियांत्रिकी महाविद्यालय वाशिम येथे तो व्हाट्सअप द्वारा प्रसारित करून तो विद्यार्थ्यांना पैसे देऊन विकण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून चालू होता. ह्यासंदर्भात दोषींवर पोलीस कार्यवाही करून कडक शासन करण्यात यावे व स्पायरल बाईड ह्या खाजगी कंपनीचा करार रद्द करण्यात यावा ह्या मागण्याचे निवेदन आकाश हिवराळे (जिल्हासंघटक) रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला, अंकुश गावंडे (विदर्भ अध्यक्ष )रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पवन गवई (महानगर महासचिव) सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला डॉ.राज बोरकर (सा. कार्यकर्ते)बिट्टू खंडारे, सागर सय्येद आदींनी दिले व आठ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
अधिक वाचा : अकोला जिल्हा परिषदतर्फे दिव्यांगांसाठी १ हजार रुपये पेन्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola