तेल्हारा(प्रतिनिधी)– तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथील दोन अल्पवयीन चिमुकल्यांना शेततळ्यात जलसमाधी मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणेकडून शेततळ्यात शोधकार्य सुरू केले होते. मात्र त्याला अपयश आले होते. १.३० वाजेच्या दरम्यान दोन्ही मृतदेह बाहेर आले होते मात्र मृतकांच्या नातेवाईकांकडून मृतदेह न काढण्याचा पवित्रा घेतला होता. यावेळी शेतमालकवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे घटनास्थळी तनावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान शेतमालकवर तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राम तालुक्यातील गाडेगाव येथील दोन अल्पवयीन मुले रोहित विनोद वानखडे (११)व देवा गजानन वानखडे(१०)काल दुपारी ५ वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या एका शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. काल रात्री उशिरा ते घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेणे सुरू केले असता दोन्ही मुलाचे कपडे शेततळ्यालगत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली होती, कपडे सापडल्याने दोन्ही मुले शेततळ्यात बुडाली असल्याची चर्चा वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली आणि बघ्याची एकच गर्दी रात्री आणि आज सकाळी शेततळ्यात जवळ जमली असून तळेगाव बाभूळगाव येथील पोहणाऱ्या इसमाकडून शोध घेतला मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आले होते. त्यांचा शोध न लागल्याने पिंजर येथील आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले होते.सदर पथक शोधकार्या साठी निघाले होते. मात्र मृतदेह बाहेर आल्याने त्यांना परत अकोला येथून जावे लागले.
यावेळी ठाणेदार विकास देवरे व नायब तहसिलदार सुरळकर,तलाठी केंद्रे हे घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा केला. यावेळी मृतदेह बाहेर आल्यानंतर नातेवाईकांनी शेतमालक दोन्ही मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धरली होती.तेल्हारा पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या सह अकोला, अकोट, उरळ, हिवरखेड येथून पोलीस ताफा बोलावण्यात आला होता. शेतमालक गजानन गावंडे यांच्या विरुध्द कलम ३०४(अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यात शेततळ्यात बुडालेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळले,घटनास्थळी तणावाची परिस्थिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola