तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथील दोन अल्पवयीन चिमुकल्यांना शेततळ्यात जलसमाधी मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.पोलीस यंत्रणेकडून शेततळ्यात शोधकार्य सुरू केले होते मात्र त्याला अपयश आले होते आता काही वेळा पूर्वी १.३० वाजेच्या दरम्यान दोन्ही मृतदेह बाहेर आले असून पंचनामा सुरू आहे.
ग्राम तालुक्यातील गाडेगाव येथील दोन अल्पवयीन मुले रोहित विनोद वानखडे (११)व देवा गजानन वानखडे(१०)काल दुपारी ५ वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या एका शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते काल रात्री उशिरा ते घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेणे सुरू केले असता दोन्ही मुलाचे कपडे शेततळ्यालगत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली होती कपडे सापडल्याने दोन्ही मुले शेततळ्यात बुडाली असल्याची चर्चा वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली आणि बघ्याची एकच गर्दी रात्री आणि आज सकाळी शेततळ्यात जवळ जमली असून तळेगाव बाभूळगाव येथील पोहणाऱ्या इसमाकडून शोध घेतला मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आले होते. त्यांचा शोध न लागल्याने पिंजर येथील आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले होते.सदर पथक शोधकार्या साठी निघाले होते मात्र मृतदेह बाहेर आल्याने त्यांना परत अकोला येथून जावे लागले. यावेळी ठाणेदार विकास देवरे व नायब तहसिलदार सुरळकर,तलाठी केंद्रे हे घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळ पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात येणार आहे.यावेळी घटनास्थळी काहीकाळ मृतकांच्या नातेवाईकांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढून योग्य ती कारवाई होणार असल्याचे सांगितले.
*यातील रोहित विनोद वानखडे हा घरच्यांचा लाडाचा एकुलता एक मुलगा होता तर मृतक देवा गजानन वानखडे याला एक भाऊ असून आई मोलमजुरी करते देवा याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून दोन्ही चिमुकल्यांचा घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.