लंडन – सर्वांना उत्सुकता लागुन राहिलेल्या विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून सुरूवात होतेय. सलामीचा सामना हा लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार असून त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ यजमान इंग्लंडसमोर उभा ठाकणार आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. ही स्पर्धा मायदेशात होत असल्यामुळे साहजिकच इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. आत्तापर्यंत इंग्लंडने एकदाही विश्वकप उंचावला नसला तरी येणारा विश्वकप इंग्लंडच्या पदरी पडू शकतो. ईऑन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील सध्याचा इंग्लंड संघ हा, आतापर्यंतचा सर्वाधिक मजबूत संघ आहे, असे मत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले आहे.
यंदा दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदाची धुरा फाफ डू प्लेसिस याच्यावर आहे. तर संघात अनुभवी हाशिम आमला, डेविड मिलर, क्विंटन डी कॉक, जेपी ड्यूमिनी, यांच्यावर फलंदाजीची मुख्य कमान असणार आहे. दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या सामन्याला त्याची उणीव नक्कीच भासणार आहे.
अधिक वाचा : ज्ञानदीप क्लासेस पातुर्डा बु. च्या पितृछत्र हरविलेल्या विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola