मुंबई(प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्यात बारावीच्या निकाला ८५.८८ टक्के लागला आहे. यात नेहमीप्रमाणे कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के निकाल लागला आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूरमध्ये ८२.५१ टक्के निकाल लागला आहे. मुंबईमध्ये ८३.८५ टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या वर्षीही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९०.२५ टक्के इतका लागला आहे तर मुलांच्या निकालाचे प्रमाण ८२.४० इतके आहे.
दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी एक वाजता त्यांचा निकाल ऑनलाईन पाहू शकतात. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी बसले होते.
विभागानिहाय निकालाची टक्केवारी
नाशिक – ८४.७७ टक्के
औरंगाबाद – ८७.८९ टक्के
मुंबई – ८३.८५ टक्के
अमरावती – ८७.८५ टक्के
लातूर – ८६.०८ टक्के
कोकण – ९३.२३ टक्के
पुणे – ८७.८८ टक्के
कोल्हापूर – ८७.१२ टक्के
नागपूर – ८२.५१ टक्के
शाखानिहाय निकालाची टक्के
आर्टस शाखा – ७६.४५ टक्के
कॉमर्स शाखा – ८८.२८ टक्के
सायन्स शाखा – ९२.६० टक्के
मुलींची पुन्हा बाजी
मुलांचे प्रमाण – ८२.४० टक्के
मुलींचे प्रमाण – ९०.२५ टक्के
अधिक वाचा : ATSने पकडलेल्या दोघांना निर्दोष मुक्तता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1