बाळापूर (डॉ शेख चांद)- मिनी मंत्रालय असलेले जिल्हा परिषद अकोला निवडणुकी साठी सर्व जि प सर्कल मधील इच्छुक उमेदवार तयारी ला लागले आहे त्या मधलेच बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे जि प सर्कल म्हणून देगांव सर्कल कडे पाहण्यात येत आहे. या मतदार संघात ऐकून १८ गावे येत यामध्ये देगांव, बटवाडी बु, बटवाडी खु., सांगवी जोमदेव, खामखेड, चिचोली गणु , तामशी, पिपंळगांव, तांदळी, धाडी, नकाशी, भरतपूर, खिरपूरी, मांडवा बु ., मांडवा खु ., बल्हाडी, नांदखेड, टाकळी कुरेशी, हे गांव असून दोन पंचायत समीती मतदार संघ आहेत.
या मतदार संघात उभे राहाणाऱ्या उमेदवारांची गर्दी वाढू शकते. या जिल्हा परिषद मतदार संघात कुणबी, मराठा , माळी मुस्लीम, मातंग, बौद्ध, धनगर, इत्यादी सह अत्यअल्प समाजाचे बहुसंख्य मतदान या मतदार संघात आहे. यापूर्वी या मतदार संघात अनुसुचीत जाती च्या अंभोरे या निवडून आल्या होत्या व सध्या महिला व बालकल्पान सभापती आहेत. त्यानी या मतदार संघात विकास कामे ही भरपूर केलीत, तर जनतेत जि प सदस्य यांनी केलेल्या ५ वर्षातील विकास कामाबाबत समिश्र प्रतिक्रीया आहे. आता हा मतदार संघ ओबीसी साठी राखीव असल्याने या मतदार संघात इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढणार आहे . प्रत्येक उभे राहणारे इच्छुक उमेदवार विकास काम करण्याचा दावा करीत आहे.
अधिक वाचा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संतनगरी शेगांव येथे संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola