शेगाव(देवानंद खिरकर)– शेगांव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक शेगांव आयोजित सूकरण्यात आली होती. वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख होते. तर प्रमुख उपस्थितीत केंद्रीय उपाध्यक्ष श्री. युसुफभाई खान, महिला मंच केंद्रीय अध्यक्ष सौ. जयश्री प्रदिपराव पंडागरे, महिला मंच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वनिता बोराडे, विदर्भ सचिव श्री. बाळासाहेब सोरगीवकर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री. योगेशजी हजारे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण पहुरकारकाका , बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री उमेश सिरसाट , खामगांव प्रेसकल्ब अध्यक्ष श्री किशोर किशोर आप्पा भोसले, होते कार्यक्रमाचे संचालन बुलढाणा जिल्हा सचिव श्री. नितेश मानकर यांनी केले. प्रास्ताविक योगेशजी हजारे यांनी तर अभार प्रदर्शन शेगांव तालुका अध्यक्ष श्री गजानन भिवटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय अध्यक्ष मा.श्री मनोहरराव सुनेसाहेब व त्यांच्या पत्नी याच्या लग्नाच्या 29 वाढदिवसाच्या औचित्य साधून सत्कार करण्यात आला. तसेच शेगांव गं.म.संस्थान मध्ये सुध्दा सत्कार केला. गेलाकार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक श्री सुनेसाहेब यांनी संघटनेच्या बद्दल माहिती सांगितली व पत्रकार कायदा, एस. टि . सवलत इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले व सत्काराला उत्तर देताना सर्वाचे संस्थानचे मनःपुर्वक आभार मानले. तर भोसले, सोरगीवकर, पंडागरे यानी मनोगत व्यक्त केले. तसेच वनिता बोराडे यांनी संपा विषय माहिती सांगितली अध्यक्षीय भाषणात कैलासबापू देशमुख यानी संघटना कुठलीही असो सर्व पत्रकारबंधुनी एकत्र काम केले पाहिजे व बातमी संदर्भ मध्ये पत्रकारा वर हल्ला झाला तर सर्व एकत्र आलो पहिजे व संघटनेच्या कार्याची व सभासद होणे विषय माहिती दिली कार्यक्रमा साठी – खामगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, वडनेर भुलजी, नांदुरा . शेगांव, हिवरखेड, अडगांव, अकोट, अकोला, मूर्तीजापूर, अमरावती जिल्ह्य़ातील पत्रकारबंधुनी हजेरी लावली होती.
अधिक वाचा : अखिल भारतीय ग्रामीन पत्रकार संघाची बैठक 26 मे रोजी संत नगरी शेगावात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola