बाळापूर(प्रतिनिधी)– बाळापूर शहरातील एक अल्पवयीन मुलीचा दिनांक ९ मार्च २०१९ रोजी मृत्यू झाल्या नंतर मुलीचे नातेवाईकांनी सदर मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव करून शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये अंतिम संस्कार करण्यात आला होता, ही घटना घडल्या नंतर काही दिवसांनी ह्या प्रकरणात काळे बेरे असल्याची दबक्या आवाजात बाळापूर शहरात चर्चा सुरू झाली, अश्यातच दिनांक २० मार्च २०१९ म्हणजे घटना घडल्या नंतर ११ दिवसांनी बाळापूर पोलीस स्टेशनला एक निनावी तक्रार प्राप्त झाली व २४ मार्च २०१९ रोजी बाळापूर शहरातीलच बिस्मिल्ला खान बुलंद खान तसेच इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी यांनी सदर अल्पवयीन मुलीच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित करून तिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिने आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येस स्थानिक अंजुमन हायस्कुल मधील शिक्षक इम्रान अहमद अय्याज अहमद हा कारणीभूत असून त्याने सदर मुलीचे लग्नाचे अमिष दाखवून लैगिक शोषण करून तिला लग्न करण्यास नकार दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा उल्लेख केला, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सदर प्रकरण गंभीरतेने घेऊन तत्काळ चौकशी सुरू केली.
मुलीचे नातेवाईक, मौलवी, अंतिम संस्कारा मध्ये सहभागी लोक ह्यांचे जबाब नोंदविण्यात आले, सर्वांनी सदर मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक असून 12 वी चे पेपर कठीण गेल्याच्या तणावातून सदर मुलीला चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले, मुलीचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सांगणारी एकही व्यक्ती समोर आली नाही, शेवटी सदर मुलीचे दफन केलेले प्रेत कबरी मधून बाहेर काढून शव विच्छेदन करण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी घेऊन तसे पत्र चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी उपविभागीय अधिकारी बाळापूर ह्यांना दिले, ह्या दरम्यान बिस्मिल्ला खा बुलंद खा ह्यांनी ह्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर येथे रिट पिटीशन दाखल केली, उच्च न्यायालयाने सुद्धा उपविभागीय अधिकारी ह्यांनी ह्या प्रकरणी लवकर निर्णय घेऊन प्रेत उत्खनन करण्याची कार्यवाही त्वरित करण्या विषयी निर्देश दिले.
दरम्यान ह्या प्रकरणी तपास वयवस्थित व्हावा म्हणून पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी स्वतः फिर्यादी होऊन दिनांक १ मे २०१९ रोजी अकस्मात मृत्यू ची नोंद करून तपास सुरू केला. उपविभागीय अधिकारी बाळापूर ह्यांची मंजुरी आदेश मिळताच दिनांक ५ मे २०१९ रोजी नायब तहसीलदार ह्यांचे उपस्थिती मध्ये सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने स्थानिक मुस्लिम कबरस्थान मधील अल्पवयीन मुलीचे प्रेत दफन केलेल्या कबरी मधून प्रेत बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन केले, ह्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी बंदोबस्ताची वयवस्थित आखणी केल्याने ह्या दरम्यान शांतता राहिली, मुलीच्या मृत्यू बाबत बाळापूर शहरात प्रचंड कुतूहल होते व ह्या प्रकरणात पोलीस काय निर्णय घेतात ह्या बाबत बाळापूर शहरातील नागरिकां मध्ये चर्चेचे पेव फुटले होते, सदर अल्पवयीन मुलीचे प्रेत जवळपास 2 महिन्यांनी बाहेर काढून शवविच्छेदन केल्याने सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने प्रदीर्घ चर्चा करून दिनांक 17 ।5 19 रोजी शवविच्छेदन अहवाल बाळापूर पोलिसांना दिला त्या मध्ये मृतक मुलीच्या गळ्यावर लिगरेचार मार्क असल्याचा उल्लेख केला परंतु मरणाचे निश्चित कारण स्पष्ट केले नाही त्या मुळे बाळापूर पोलिसांचा आणखी गोंधळ उडाला, परंतु बाळापूर पोलिसांनी आज पावेतो केलेल्या तपासा चे संक्षिप्त माहिती देऊन सदर मार्क हे गळफास घेतल्याने होऊ शकतात काय ह्या बाबत अभिप्राय घेतला असता ,वैद्यकीय चमूने सकारात्मक अहवाल दिल्याने पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विठ्ठल वाणी ह्यांनी ह्या प्रकरणात आणखी साक्षीदार निष्पन्न करून अंजुमन हायस्कुल चा शिक्षक इम्रान अहमद अय्याज अहमद ह्याने सदर मुलीला लग्न करण्याचे अमिष दाखवून तिचे लैगिक शोषण करून लग्नास नकार दिल्याने सदर अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न करून व मुलीचे वडिलांनी ही बाब पोलिसां पासून लपवून ठेवून मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक झाल्याचे भासवून परस्पर अंतिम संस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने तपास अधिकारी विठ्ठल वाणी ह्यांनी स्वतः फिर्यादी होऊन आरोपी विरुद्ध कलम 376(2),फ,न, 306, 201,176,177,34, भादवी तसेच कलम 5(ल), 6 पोक्सो कायद्या प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल केला, पुढील तपास पोलिस अधीक्षक राकेश कला सागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, जयसिंग पाटील, अनिता इंगळे हे करीत आहेत,दोन महिन्या पूर्वी मृत पावलेल्या अल्पवयीन मुलीला बाळापूर पोलीस न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याने बाळापूर शहरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola