अकोट(प्रतिनिधी)- दि 22 मे रोजी शिवमंगल कार्यालय येथे प्रहारची एकदिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा पार पडली मा. आमदार बचुभाऊ कडु यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसे भाजपशिवसेना युती सरकार शेतकरी व सर्वसामान्यांनवर अन्याय करणारी आहे. तसेच प्रहार जातीधर्माच्या नावावर नाही तर सेवेच्या माध्यमातून काम करणार आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांना मदत केली पाहिजे. मदत करताना कुणाची जात न धर्म पाहता त्याचे दुःख आपण कसे दूर करू यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकी साठी सज्ज राहावे आकोट मतदार संघावर प्रहारचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी यावेळेस केला. त्यानंतर प्रहार जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी म्हटले की आकोट मतदारसंघात विकासाची टक्के वारी न वाढता फक्त कमिशन खोरी वाढली आहे, विकासाच्या नावावर ठेकेदारी सुरु असल्याचा आरोप तुषार पुडकर यांनी केला. तसेच भाजपशिवसेना ऐका नाण्याच्या दोन बाजु आहे याचे मोर्चे निवेदने एकमेकांशी भांडणे सर्व दिखावटी आहे .
या तालुक्याच्या समस्या सोडवण्याचे काम प्रहारने प्रामाणिक पणे केले आहे आणी असेच प्रामाणिक पणे करणार असे सांगितले ऐक दिवसीय कार्यशाळेची समाप्ती झाल्या नंतर शौकत अली चौक येथे इफ्तार पार्टी मध्ये सहभाग नोंदवला तसेच ख्वाजा फँगशन हॉल मध्ये इफ्तार पार्टी मध्ये सहभाग नोंदवून पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या तसेच हॉटेल अतिथी मध्ये शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षक हा समाजासाठी मार्गदर्शक राहिला आहे. तसेच शिक्षकांवर अन्याय झाल्यास प्रहार हा अन्यान खपून घेणार नाही असे रोकठोक मत आमदार बचुभाऊ कडु यांनी मांडले. श्रद्धा सागर येथील बालसंस्कार केंद्रास भेट देऊन गुरुवर्य वासुदेव महाराजांचे दर्शन घेतले तसेच संस्कार शिबिरा मधील संस्कार जीवनाची शिदोरी असल्याचे आपल्या स्वागत पर भाषणात सांगितले मंचा वर प्रमुख उपस्तिथी मध्ये गजानन पुंडकर माजी जिल्हापरिषद, उपाध्यक्ष गजानन गावंडे, माजी संचालक कृषी उत्पन बाजार समिती आकोट, मुंडगावचे उपसरपंच तुषार पाचकोर, मुरली भाऊ चोधरी, कुलदीप वसु, सरपंच लांमकानी तसेच कुलदीप वसु, सरपंच लोतखेड निखील गावंडे, नगर सेवक विक्की मल, अविनाश घायसुंदर, मुन्ना बिहाडे, सागर उकंडे, गणेश गावंडे, राहुल देशमुख , विशाल भगत, संदीप मर्दाने, ओम म्हसाळा, सुरज खरोडे, चैतन नाचणे, संदेश टोलमारे, अजय सुरत्ने, किशोर देशमुख, संदीप वालसिंगे, जय गावंडे, गोपाल गुगड, रवी गुगड, रवी ताथोड, अशोकराव नेमाडे, बचु भगत, बंटी पांडे, समीर जमदार, वसीम भाई, हनुमंत चोधरी, दिपक जायले, रामेश्वर जायले, पंकज हाडोळे, अचल बेलसरे, शुभम बोडखे , शयलेश नायवडे, प्रदीप पाथरीकर, शाम वाघमारे, पंकज खोले, पियुष बीजने, संजय आकोटकर, संदीप वॉलसिंगे, नसीर पहेलवान, गजानन कालमेघ, शेखर भिसे, राजेश ठोकळ, बंडू शिरसाट, तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्तीत होते.
अधिक वाचा : अखिल भारतीय ग्रामीन पत्रकार संघाची बैठक 26 मे रोजी संत नगरी शेगावात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola