नवी दिल्ली : 17 व्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. यात सर्वप्रथम टपाल मतांची मोजणी करण्यात आली. 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत 7 टप्प्यांमध्ये या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. देशभर सरासरी 67.11% मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात मतदानाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. विशेष म्हणजे, 10 पैकी 9 एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एडीएला स्पष्ट बहुमताचे भाकित वर्तवण्यात आले होते. त्यामुळे, देशात पुन्हा नरेंद्र मोदींची सत्ता येणार ही विरोधक अचानक धक्का देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
Live Updates
– भोपाळमध्ये भाजपच्या प्रज्ञा सिंह ठाकूर 30 हजार मतांनी आघाडीवर
– अमेठीतून स्मृती इराणी 2000 मतांनी पुढे
– दिल्लीतील सर्व 7 जागांवर भाजप आघाडीवर, वाराणसीत आताच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
– श्रीनगर येथून फारूक अब्दुल्ला आणि पंजाबच्या उधमपूर येथून केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद पुढे
– पाटणा हुजूर साहेबमध्ये काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पुढे, रवीशंकर प्रसाद पिछाडीवर
– संगरूर येथून आपचे उमेदवार भगवंत मान आघाडीवर
– तिरुवनंतपुरममध्ये माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर मागे
– बेगुसराय येथून भाजपचे गिरीराज सिंह यांची आघाडी
– रायबरेलीतून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी मागे, अमेठीत राहुल गांधी देखील पिछाडीवर
– दिल्लीतील 7 जागांपैकी 6 जागांवर भाजपची आघाडी, एका ठिकाणी काँग्रेस पुढे
– गुरुदासपूर येथून भाजप उमेदवार सनी देओल पिछाडीवर
– भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह 10 हजार मतांनी पिछाडीवर
– वाराणसीतून नरेंद्र मोदी 11 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
– एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी हैदराबाद येथून पुढे
– राहुल गांधींचा गड अमेठीतून स्मृती इराणी यांची आघाडी
– वायनाड येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर
– गांधीनगर येथून भाजप अध्यक्ष अमित शहांची 25 हजार मतांची आघाडी
– वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
अधिक वाचा : व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवरून विरोधकांना डबल झटका
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola