नवी दिल्ली: एक्झिट पोल आल्यानंतर ईव्हीएम मशीनवरून आदळआपट करणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने जोरदार झटका दिला आहे. सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, तर उत्तर प्रदेशातील ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवून मोठा झटका दिला आहे.
टेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली होती. व्हेरिफिकेशनसाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. ही मागणी मेरिटवर आधारित नाही, असं सांगून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.
आयोगाचाही झटका
सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगानेही विरोधकांना झटका दिला आहे. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आकांडतांडव केलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांचे हे सर्व मुद्दे फेटाळून लावले आहेत. सर्व पक्षाच्या उमेदवारांसमोरच ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्याची व्हिडिओ शुटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी लावलेले आरोप निराधार आहेत, असं आयोगानं म्हटलं आहे.
अधिक वाचा : मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola