अकोला (प्रतिनिधी)– विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र शेगावी असलेल्या ‘ आनंदसागर ‘ या पर्यटन स्थळाला महाराष्ट्र शासनाने पुढील ३० वर्षासाठी वाढीव लीज मंजूर केली आहे .
शेगाव हद्दीतील ही जागा सन १९९९-२००० मध्ये शेगाव श्री संस्थानने तलाव सौंदर्याकरण व विकास प्रयोजनासाठी रितसर अर्ज करून शासनाकडे मागितली होती. ही १०१ हेक्टर ७२ आर. पडीत जमिन संस्थानला सरकारकडून मिळाली. अवध्या१५ वर्षात संस्थानने या परिसराचा कायाकल्प केला. एक जागतिक दर्जाचे सुंदर पर्यटनस्थळ येथे उभारले. देशभरातून भक्त येथे येतात ‘शिवाय विदेशातूनही लोक येथे येतात. या तलावातून शिर्डी -नागपूर सीप्लेन हवाई सेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याची ट्रायल मागील वर्षी नागपूर व शेगाव येथे झाली. या विकसीत केलेल्या जागेची लीज संपल्याने संस्थानने सन २०१२मध्ये वाढीव लीजसाठी सरकारकडे विनंती अर्ज केला होता. ७ वर्षापासून हा अर्ज पेडींग होता. शासनाने एका आदेशाव्दारे नुकतीच ३० वर्षाची लीज संस्थानला वाढवून दिली. त्यामुळे श्री संस्थान आता नव्या जोमाने या आनंद सागर परिसरात विकासकामे व सौंदर्याकरण राबविणार आहे. आनंद सागरच्या वेळेत केलेला बदल, लहान मुलांच्या खेळणींवर टाकलेली बंदी व आनंदसागर बंद होणार या चर्चांना आता यामुळे विराम बसणार.
अधिक वाचा : दिव्यांग धिरजची इंडिया बुक ऑफ़ रेकार्डमधे नोंद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1