नवी दिल्ली : लोकसभा निकालाच्या तीन दिवस आधी पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर लीटरमागे १६ पैशांनी वधारला. देशाच्या राजधानीतही इंधन दर वाढले आहेत. यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या काळात सरकारने कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसात इंधन कंपन्यांनी फारशी वाढ केलेली नव्हती. या काळात झालेले नुकसान आता भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
जागतिक इंधन बाजारातील स्थिती सध्या फारशी चांगली नाही. अरब राष्ट्रांमधील तणाव, इराण, व्हेनेझुएलामधून कमी झालेला तेल पुरवठा यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडू शकतो. सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लीटरमागे 5 रुपये, तर डिझेल दरात प्रती लीटरमागे ३ रुपयांची सवलत दिली होती. या सवलतीमुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी इंधन कंपन्यांकडून दर वाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे.
सध्याचे दर काय आहेत जाणून घ्या
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रती बॅरलमागे ७० डॉलरहून अधिक आहे. गेल्या ऑगस्टमध्ये खनिज तेलाचा दर इतका असताना भारतात पेट्रोलचा दर ७८ रुपयांच्या, तर डिझेलचा दर ७० रुपयांच्या आसपास होते. मात्र सध्याच्या घडीला भारतात पेट्रोल ७३, तर डिझेल ६७ रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाल्याने आता लवकरच इंधन दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : एक्झिट पोलने दिले संकेत, पुन्हा मोदी सरकार!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola