अकोला(प्रतिनिधी) – पेपर सुरू असताना मोबाईल जवळ वापरणे नियमाला धरून नसतानाही एका विद्यार्थ्याने मोबाईल जवळ ठेवला. वर्गावर असलेल्या शिक्षकाला याची माहिती मिळताच त्यांनी मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून दोन तास महाविद्यालय प्रशासनाला वेठीस धरले. पियुष अवचार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बाभुळगावच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी हा प्रकार घडला.
बाभुळगावातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी केमिकल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या सत्राचा पेपर होता. यावेळी पियुष अवचार या विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्याने पर्यवेक्षकाने त्याचा पेपर घेतला. याचा राग आल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समन्वयकांनी सांगितले. इतर विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळूनही त्यांच्यावर कारवाई न करता प्राध्यापकांशी असलेल्या वादातून माझ्यावर कारवाई केली.
माझ्याकडे सीसीटीव्ही फिरवून छळ करण्याचे काम महाविद्यालयाने केले, असा आरोप विद्यार्थी पियुष अवचारने केला.मोबाईल इतरही विद्यार्थ्यांकडे आढळले, पण कारवाईचा प्रयत्न मात्र माझ्यावरच केला, मला न्याय मिळावा म्हणून मी दोन तास कॉलेजच्या छतावर उन्हात बसलो. असे पियुष अवचारने सांगितले आहे. महाविद्यालय परिसरात यानंतर असे कृत्य केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पोलिसांकडून विद्यार्थ्याला दिली आहे.
अधिक वाचा : प्रशांत मानकर यांच्या मार्फत वाडेगांवात मोफत पाणी वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola