वाडेगांव(प्रतिनिधी) : वाडेगांव मध्ये पाण्याची पातळी खोल गेल्याने यावर्षी गावकऱ्यांना पाण्यासाठी दुर दुर जावे लागत असतांना गावातील काही लोकांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले आहे. माजी उपसभापती तथा पं. स. सदस्य प्रशांत मानकर यांनी स्वतः स्वखर्चाने पाण्याचा टॅंकर सुरु केले आहे. त्यांचे कौतुक गांवात होत आहे. त्याच प्रमाने गावात त्यांच्या विहीर, बोर ला पाणी आहे असे दान सुर लोकही पाण्याचा वाटप करीत आहे.
यामध्ये फारूक कच्ची, मन्यार मज़िद, सोफी चौक मज़िद, हनीफ कच्ची, शिवलाल काळे सर, श्रीक मेडीकल्, शिव पेट्रोल पंप महात्मा फुले बँक, त्याच प्रमाणे टॅकर द्वारे मोफत पाणी वाटप करनारे प्रशांत मानकर ,दिपक सेठ मसने, मो अफत्तार, विनोद राहुडकर, सचेंद्र तिडके, माझी सरपंच सौ उषाताई राऊत हे गावात पाणी वाटप करीत आहे. तसेच अधिग्रहण काण्यात आलेल्या विहिरी मध्ये चान्नी फाटा येथील लोखंडे यांची, तर अकोला रोड वरील अजीज खान, शेख इलीयास भाई, डॉ शेख चांद शेख नजरू यांच्या विहीरीचे पाणी नळ योजनेच्या विहीरीत सोडण्यात आले असून ते पाणी पाण्याच्या टाकीत टाकून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु वाडेगांव ग्राम पंचायत प्रशासनने संबंधीत विभागाला पाणी टंचाई बाबत वारंवार पत्र व्यवहार करून ही अजून पर्यंत संबंधीत विभागाने कोणताच निर्णय घेतल्याचे समझले नाही. पाणी टंचाई व चारा डेपो या समस्या संबंधीत विभाग सोडवनार का ? अशी चर्चा गावकऱ्यात आहे.
अधिक वाचा : वाडेगांव येथील लक्ष्मी नारायण नगर मधील दारू चे दुकान स्थलांतरचा प्रस्ताव रद्द करण्या साठी आमरण उपोषण सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola