अकोला (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना ६ मे रोजी पत्राद्वारे दिले.
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधील भूजल पातळी खोल जात असल्याने, नागरिकांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी टँकरद्वारे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना ६ मे रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत.
अधिक वाचा : सोमवारी अकोला शहर व तेल्हारा तालुक्यातील देखभाल व दुरुस्तीकरिता काही उपकेंद्रावरील वीज पुरवठा बंद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola