अकोला : महावितरणच्या अकोला शहर व तेल्हारा उपविभागातंर्गत असलेल्या काही उपकेंद्रावरील वाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीचे काम १३ मे सोमवारी करण्यात येणार असल्याने काही वेळाकरिता या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
अकोला शहरातील डाबकी या ३३ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी ७ ते १० या वेळेत तसेच उमरी या ३३ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत आणि एमआयडीसी १३२ केव्ही उपकेंद्रावरून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा दुपारी २ ते ५ या वेळेत देखभाल व दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने बंद राहणार आहे यासोबतच अकोट विभागाअंतर्गत तेल्हारा उपविभागातील ३३ के.व्हि. तेल्हारा व माळेगाव बाजार या उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तसेच दानापूर, सौंदळा व बेलखेड या ११ केव्ही वीज वाहिन्याचा विद्युत पुरवठा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत देखभाल व दुरुस्ती चे कामे करण्यात येणार असल्याने बंद राहणार आहे, तरी या भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola