अकोला (प्रतिनिधी) : वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जात होता. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई-चालान पध्दती सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रणालीसाठी एम-स्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशीन असणार आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर जोडले आहे. या पध्दतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना याची माहितीही तात्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तेथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार असल्याचे सांगण्यात आले. वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की नाही, याबाबत संशय घेण्यात येतो.
यामुळेच या पारदर्शकता यावी या उद्देशाने ई-चालान प्रणाली सुरु करण्यात आल्याची सांगण्यात येत आहे. फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानुसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेला तात्काळ नोंदविली जाणार आहे. त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे. प्रसंगी डेबिट कार्डवरुनही रक्कम वळती करता येणार आहे. ज्याने दंड भरला, त्याला अधिकृत पावती दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास वाव राहणार नाही. आज दिनांक १० मे रोजी रोजी पोलीस मुख्यालय अकोला मनोरंजन हॉल येथे E-Challan मशीन बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाकरीता शहर वाहतुक शाखा अकोला, अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे वाहतुक कर्मचारी, तसेच महामार्ग सुरक्षा पथक बाळापूर अकोला येथील कर्मचारी हजर होते.
या प्रणालीच्या शुभारंभा नंतर लगेचच ती कार्यान्वित करण्यात येणार आहे. परवानाधारकांचा तपशील कळेल या प्रणालीला आरटीओ आणि पोलीस खात्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे एखादे वाहन पकडले तर ते वाहन यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात वापरले गेले होते काय, चालकावर गुन्हे आहेत काय, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola