अकोट (देवानंद खिरकर) : अकोट ग्रामीन अन्तर्गत सातपुडयाच्या पायथ्याशी येत असलेल्या पोपटखेड बीट हद्दीतील जामून नाल्यामधे तसेच बंद पाडलेल्या खदानीमधे असलेल्या अवैध गावरान दारूच्या एकुण सहा हातभट्यावर ग्रामीन पोलीसांनि कारवाई केली.
साथपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामधे मोठ्या प्रमाणात कष्टकरी आदीवासी बहुल समाज राहतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावरान दारू निर्मिती व विक्री केली जाते.सातपूडयाच्या पायथ्याशी असलेल्या बरेच गावामधे दारूमुळे बरेच लोकांचे स्वसार उधवस्त झाले आहेत.तसेच काहि तरुण सुधा व्यसनाच्या आहारी गेल्याने मारामारीचे सुधा प्रकार खुप वाढले आहे.
या पाश्वभुमिवर व रमजान महिना,तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट ग्रामीणचे ठाणेदार न्यानोबा फ़ड यानी आज सकाळीच ड़ी बी पथक व बीटजमदार कर्मच्यारी यांच्या मदतीने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामून नाला व बंद पाडलेल्या खाणीमधे इम्ब्राहिम खान, निलेश रंगारी, मधुकर सूरगाये, मुकेश साल्पेकर, संजय महाले, आकाश सूरत्ने, यांच्या अवैद्यरित्या सुरु असलेल्या गावरान दारूच्या हातभट्यावर तसेच अंभोडा येथिल कैलाश पाटील यांच्या देशी दारूच्या अडयावर धाडि टाकुन एकुण 55,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद सर्व आरोपी विरुध महाराष्ट्र दारूबंधी अधिनियम कलम 65 क ड फ फ ई प्रमाणे अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमधे एकुण साथ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.आजरोजी केलेलया कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणारे व निर्मिती करनार्याचे धाबे दणाणले असुन नमुद कारवाई बद्दल नागरिकामधे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अकोट ग्रामीणचे ठानेदार न्यानोबा फ़ड यानी यापुढे सुधा अवैध दारुवाल्यांच्या अडयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.सदर कारवई मा उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठानेदार न्यानोबा फ़ड गुन्हे शोध पथकाचे नारायण वाडेकर,अनिल शिरसाट,प्रवीण गवळी,गजानन भगत,विजय पंचबुधे,रामेश्वर भगत,अमोल बुंदे,विकास गोलोकर,चालक विलास अस्वार यांनी केली.
अधिक वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा प्रशासनाला दुष्काळाची जाणीव करून दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola