अकोला(प्रतिनिधी)– महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक खडकी येथील रहिवासी किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात) अग्निशमन सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींपैकी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे व धिरज प्रल्हाद गावंडे या तीघांनी मंगळवारी पहाटे सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वादाच्या सुनावणीसाठी सोमवारी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात आलेल्या किसनराव हुंडीवाले यांच्यावर विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर रा. बार्शीटाकळी यांनी हल्ला चढविला. टेबल, खुर्ची आणि लाकडी काठ्यांनी त्यांना मारहाण करीत असतानाच विक्रम ऊर्फ छोटु गावंडे याने अग्निरोधक सिलिंडर काढून तीन वेळा त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याने हुंडीवाले रक्ताच्या थारोळ्यात पडले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. शैक्षणिक संस्थेतील वाद तसेच गावंडे यांची नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्याने किसनराव हुंडीवाले यांची हत्या करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर या नऊ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १४३,१४७,१४८,१४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : धक्कादायक ; अकोल्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात व्यावसायिकाचा खून
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola