तेल्हारा (प्रतिनिधी) – तेल्हारा शहरातील श्री शिवाजी हायस्कूल च्या भव्य पटांगणात 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिना निमित्त हिंदु मुस्लीम बौद्ध एकता मिशन तथा टिपू टायगर ग्रुप चे अध्यक्ष मोहसिन शेख यानी आयोजन केले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन मुस्लीम धर्मगुरू हजरत मौलाना मुफ्ती हारुण साहब,संभाजी बिग्रेट चे कपिल ढोक, जेष्ट व्याख्याते प्रा भीमराव परघरमोर सर,युवाशिवव्याख्यता सचिन थाटे, मुलंनिवासी संघाचे राजेश नुपनारायण सर,हे होते यावेळी आपल्या भाषणातून मौलाना हारुण यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी समाजाला शिका संघटीत व्हा संघर्ष करा हा त्रि सुत्री मुल मंत्र दिला त्याच प्रमाणे कुराण मध्ये सुद्धा पहिल्याच वाक्यात इक्रा म्हणजेच तालीम हसिल करो अशा प्रकारचा संदेश दिला पुढे ते म्हणाले की जगातील अनेक सत्ताधिश अन्याय अत्याचार करताना संपून गेले म्हणुन भारता मध्ये कोणिही कोणावर अन्याय अत्याचार करु नये असे आपल्या मार्गदर्शनातून केले
संभाजी ब्रिगेट चे प्रवक्ते कपिल ढोक यानी गेल्या 25वर्षा मध्ये ओ बीसी च्या घरा मध्ये बाबासाहेब आंबेडकरा ची प्रतिमा तर मुस्लिमा पर्यंत शिवाजी महाराज घेऊन जाण्यास संभाजी बिग्रेड च्या माध्यमातून आम्ही यशस्वी झालो असे मत व्यक्त केले
प्रा भीमराव परघरमोर सर यानी टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हटले की इतिहासाने टिपू सुलतान यांचे वर अन्याय केला त्याचा चांगुलपणा झाकुन ठेउन त्याना धर्मविरोधी अन्यायी राजा संबोधण्यात चुकीचा प्रयत्न केला असे मत त्यानी व्यक्त केले
प्रा राजेश नुपनारायण सर यानी मुस्लीम समाजाला आवाहन केले की,कोणिही देशाला हिंदुस्तान म्हणू नये भारत असे म्हणावे
युवा शिव व्याख्याते सचिन थाटे यानी शिवाजी महाराज ह्यानी सर्व अठरा पगड जाती समुहाला घेऊन स्वराज स्थापन केले होते त्यात मुस्लिमाचा सहभाग मोठा होता असे मत व्यक्क्त केले
मंचकावर प्रशांत देशमुख पत्रकार तथा मराठा सेवा संघा चे प्रशांत विखे व मुस्लीम समाजा चे अनेक मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहसिन शेख यानी केले तर कार्यक्रमाचे यानी केले तर कार्यक्रमाचे यशस्वी साठी टिपू सुलतान ग्रुप च्या कार्यक्रमाचे यशस्वी साठी टिपू सुलतान ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तर उपस्थीत सर्व मान्यवर याना कुराण शरिफ ची प्रति भेट देण्यात आल्या यावेळी मोठा जन समुदाय उपस्थीत होता