तेल्हारा – पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या वृक्षांची जोपासना करण्यासाठी वृक्षतोडीला बंदी घालण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेतला आहे. मात्र वृक्षतोडीमध्ये आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या लोकांकडून वृक्ष तोडीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत तेल्हारा शेगाव रस्त्यावर कृषि विभागाच्या कार्यालया समोर काही अज्ञात व्यक्तींनी 4 मे ला झाडाच्या बुध्याला आग लावून झाड रस्त्यावर पडल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती या वरून झाल्याच्या बुंध्याला आग लावणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे या गंभीर विषयाकळे महसूल विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या वृक्षांची जोपासना करण्यासाठी वृक्षतोडीला बंदी घालण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेतला आहे. मात्र वृक्षतोडीमध्ये आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या लोकांकडून वृक्ष तोडीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातलीच एक म्हणजे झाडाच्या बुंध्याशी आग लावून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न सध्या सर्रासपणे सुरू आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे कायद्याने वृक्ष तोडण्यास मनाई केली आहे. तसेच वृक्षप्रेमींच्या सजगतेमुळे थेट वृक्षतोड करणे अवघड होत आहे. त्यामुळे यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येताना दिसतो. काही ठिकाणी फांद्या तोडण्याच्या नावाखाली झाड तोडण्याचा प्रकार घडताना दिसतो, तर काही झाडांच्या मुळाशी विषारी रसायने टाकून तीे निजीर्व करण्यात येतात. वृक्षांच्या साली काढून त्यांना वाळवण्याचे ‘पातक’ केले जाते. तेल्हारा शहरासह तालुक्यात अशाप्रकारे झाडांची कत्तल केलि जात आहे. परंतु त्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवत नसल्यामुळे दिवसेंदिवस तालुक्यात वृक्ष कत्तल वाढतच आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचाच हात असल्याचे बोलल्या जात आहे. कारन नेहमीच अशी झाडे तोडली जातात मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. तसेच आज कृषि विभाग कार्यालया समोरच्या झाडाला आग लावून पडल्याचा प्रकार घडल्यामुले कृषि विभागाचे कर्मचारी झोपित असल्याचे दिसत आहे. या प्रकारच्या होणार्या प्रत्येक प्रकारावर कार्यवाही झाली तरच पर्यवारानाचे समतोल राहिल अन्यथा ५० अंश सेल्सिअस तापमान वाढायला वेळ लागणार नाही वृक्ष तोडी ची टोडी आता पुन्हा सक्रिय झाली असून या कडे संबधित सर्व विभागांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे